पुणे
गणांच्या आरक्षणासाठी जुन्नरला सोमवारी सोडत
जुन्नर, ता. १० : पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५करिता सार्वत्रिक गणांसाठी सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठीची सोडत सोमवारी (ता. १३) जुन्नर येथील पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात दुपारी १२ वाजता काढण्यात येणार असल्याचे तहसीलदार डॉ. सुनील शेळके यांनी सांगितले.
आरक्षण सोडतीसाठी उपजिल्हाधिकारी पल्लवी घाडगे यांची निरीक्षण अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ मधील तरतुदीनुसार व जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम नियमानुसार पंचायत समितीमध्ये अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व त्यात महिलांसाठी राखीव ठेवावयाच्या जागा, तसेच सर्वसाधारण महिलांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करण्यासाठी या सोडतीचे आयोजन केले आहे.