बिबट प्रश्नासाठी 
आता अभ्यास नको, कृती हवी

बिबट प्रश्नासाठी आता अभ्यास नको, कृती हवी

Published on

जुन्नर, ता. ७ : सध्या जुन्नर वनविभागात बिबट मानव संघर्ष टोकाला गेला असल्याचे दिसून येत आहे. यावर अनेक उपाययोजना करण्याचे नियोजन होत आहे. बिबट समस्येवर मात करण्यासाठी आज कोट्यवधी रुपये खर्च केला जात आहे, मात्र जुन्नर वनविभागाकडे अजूनही स्वतःचा पशुवैद्यक नाही, ही मोठी शोकांतिका आहे. बिबट प्रश्न सोडवण्यासाठी आता कृती करण्याची वेळ आली आहे.
बिबट नसबंदी हा एक उपाय असला, तरी त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक राहणार आहे. परवानगी मिळाली तरी यासाठी पशुवैद्यकीय सर्जन, तसेच बिबट्याला बेशुद्ध करणारा तज्ज्ञांची गरज लागणार आहे. वन विभागाला याबाबत गोपनीयता बाळगावी लागणार आहे. बिबट पकडणे व नसबंदी केल्यानंतर त्याच भागात सोडावा लागेल. यात ⁠नर बिबट्या असेल, त्याची नसबंदी करून त्याच दिवशी सोडता येईल. ⁠मादी बिबटची मात्र नसबंदी शस्त्रक्रिया करावी लागणार असून, किमान एक महिन्यानंतर तिला व्यवस्थित करून सोडावे लागेल. त्यामुळे मादी बिबटची नसबंदीनंतर तिची खूप काळजी घ्यावी लागणार असल्याने ही प्रक्रिया अडचणीची आहे. मादी बिबटला हार्मोनल इम्प्लांट लावून सोडता येईल, परंतु हे इम्प्लांट फक्त एक किंवा दोन वर्षासाठी उपयुक्त ठरते, असे या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

गावोगावी एआय यंत्रणा गरजेची
गावोगावी बिबट प्रवण क्षेत्रात बिबट्या आल्याची सूचना देणारी एआय यंत्रणा कार्यान्वित करण्यास प्राधान्य दिले गेले पाहिजे. याचबरोबर अशी सूचना मिळताच गावोगावी रेस्क्यू टीम, तसेच नागरिकांचे प्रबोधनासाठी पथक तयार करणे गरजेचे आहे. एआय यंत्रणा अनायडरपेक्षा प्रभावी ठरत असल्याने तिचा वापर वाढला पाहिजे. सध्या बिबट आल्याची सूचना ही वनविभागाच्या पातळीवर येत आहे. ती परिसरातील ग्रामस्थांच्या मोबाईलवर कशी मिळेल, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे झाले आहे.

गणनेत वेळ घालवायला नको
ऊसक्षेत्र महाराष्ट्रात सर्वत्र पसरलय. बिबट पकडून कितीही ठेवले तरी त्यांची जागा दुसरे बिबट घेतात. जुन्नर वनविभागात बिबटविषयी भरपूर अभ्यास झाला आहे. बिबट गणनेत देखील वेळ घालवू नये. यात तीन ते पाच वर्षे निघून जातील, मात्र निश्चित संख्या मिळणार नाही. बिबटला सहज पिल्ले होतात. त्यामुळे त्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बिबट नियंत्रण करण्याची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com