जुन्नरमधील निवडणुकीसाठी उद्यापासून अर्ज स्वीकारणार
जुन्नर, ता. ८ : जुन्नर नगर परिषद निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर प्राथमिक तयारी पूर्ण झाली असून, सोमवारपासून (ता. १०) उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा हवेलीचे संजय गांधी योजनेचे तहसीलदार अमोल कदम यांनी दिली.
उमेदवारांनी ऑनलाइन तसेच ऑफलाइन दोनही पद्धतीने अर्ज भरून सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत जात प्रमाणपत्र, तसेच विविध कागदपत्रे व घोषणापत्रे जोडणे आवश्यक आहे. एक खिडकी योजनेतून दाखले देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उमेदवारांनी ऑनलाइन तसेच ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज भरून सादर करणे आवश्यक आहे. ४ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्या अनुषंगाने शहरातील सर्व फ्लेक्स, बॅनर्स काढून टाकले असून, नावांच्या पाट्या, कोनशिला झाकून टाकल्या आहेत. आता विनापरवाना पत्रके, फ्लेक्स, बॅनर्स लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. मतदारांना पैसे वाटप, विविध प्रलोभने, धाकदपटशा दाखवणाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. उमेदवारांना नगराध्यक्षपदासाठी साडेसात लाख रुपये आणि नगरसेवक पदासाठी अडीच लाख रुपये खर्चाची मर्यादा आहे. शहरातील नागरिक व राजकीय पक्षांनी या निवडणूक प्रक्रियेत उत्साहाने सहभाग घ्यावा. निवडणूक शांततेत, सुव्यवस्थेत व निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन अमोल कदम यांनी केले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी चरण कोल्हे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

