जुन्नरला पोलिस रेकॉर्डवरील २९३ जणांना नोटिसा

जुन्नरला पोलिस रेकॉर्डवरील २९३ जणांना नोटिसा

Published on

जुन्नर,ता.१५:जुन्नर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील पोलिस रेकॉर्ड वरील २९३ जणांना प्रतिबंधक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या असल्याचे पोलिस निरीक्षक किरण अवचर व उपनिरीक्षक ऋषी तिटमे यांनी सांगितले. जुन्नर नगरपरिषद तसेच आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका शांततेत पार पाडाव्यात तसेच कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी ही कार्यवाही करण्यात आली आहे.
ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिह गिल, जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या निर्देशानुसार प्रतिबंधक कायदेशीर कारवाई करण्यात येत असून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलमानुसार तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम,महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलमानुसार ही कारवाई करण्यात येत असल्याचे अवचर यांनी सांगितले. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १२६ प्रमाणे २००, कलम १२९ नुसार ७४ व दारूबंदी अधिनियमा नुसार १९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या बरोबर आवश्यकतेनुसार कलम १६८ व १६३ नुसार कारवाई प्रस्तावित असल्याचे सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com