
निळूंजला जलशुद्धीकरण यंत्रणेचे उद्घाटन
खळद, ता. ७ : ''''पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यपदाच्या काळात निळूंज गावासाठी भरपूर निधी देण्याचा प्रयत्न केला. यापुढे देखील निळूंज ग्रामपंचायतच्या विकास कामांना अधिक गती देण्यासाठी आमदार संजय जगताप व खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे पाठपुरावा करून गावचा विकास करणार आहे,'''' असे आश्वास माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय झुरंगे यांनी दिले.
निळूंज (ता.पुरंदर) येथे ग्रामपंचायतच्या वतीने बसवण्यात आलेल्या जलशुद्धीकरण यंत्रणेचे उद्घाटनप्रसंगी दत्ता झुरंगे बोलत होते. ते पुढे म्हणाले बेलसर, निळूंज, वाळुंज, खळद या रस्त्यासाठी ६० लाख रुपयांची तरतूद केली असून लवकरच या रस्त्याचे काम सुरू होणार आहे तर गावातील अंगणवाडी, स्मशानभूमी यांच्यासाठी देखील अधिकचा निधी दिला आहे.
यावेळी सरपंच रूपाली जगताप, एखतपूर मुंजवडीच्या माजी सरपंच राणी झुरुगे,माजी सरपंच गणेश होले, ग्रामपंचायत सदस्य समीर बनकर, सोमनाथ बोरावके, भगवान बनकर, उमेश बनकर, दीपक बनकर, रामभाऊ लडकत, हरिभाऊ लडकत, संजय जगताप, तुकाराम बनकर, मनीषा पोरे, संजिवनी बनकर, प्रकाश कामथे, आबा खवले उपस्थित होते.
01806