बेलसर-निळुंज सोसायटीच्या अध्यक्षपदी व्यंकटराव गरुड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेलसर-निळुंज सोसायटीच्या 
अध्यक्षपदी व्यंकटराव गरुड
बेलसर-निळुंज सोसायटीच्या अध्यक्षपदी व्यंकटराव गरुड

बेलसर-निळुंज सोसायटीच्या अध्यक्षपदी व्यंकटराव गरुड

sakal_logo
By

खळद, ता. ११ : बेलसर-निळुंज (ता. पुरंदर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी व्यंकटराव गरुड; तर उपाध्यक्षपदी सुनील चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकारी अधिकारी श्रेणी १चे काकासाहेब धस यांनी काम पाहिले. यावेळी बाळासाहेब जगताप, हनुमंत जगताप, अर्जुन गरुड, विलास जगताप, श्‍यामराव कदम, गणेश होले, रामदास जगताप, सचिन भोईटे, काशिनाथ जगताप, ताराबाई जगताप, वंदना गरुड आदी संचालक उपस्थित होते. तर, उपसरपंच धीरज जगताप, कैलास जगताप, संभाजी गरुड, माउली जगताप, विठ्ठल जगताप, शिवाजी जगताप, विजय गरुड, सुनील गरुड, चंद्रकांत बेलसरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सोसायटीच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी व शेतकऱ्यांना विविध माध्यमातून सक्षम बनवण्याच्या हेतूने व सहकारी सोसायटीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही तत्परतेने काम करणार असल्याची माहिती अध्यक्ष गरुड यांनी यावेळी दिली.