
वाळुंज सोसायटीच्या अध्यक्षपदी अंकुश इंगळे
खळद ता. १ : वाळुंज (ता.पुरंदर) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी अंकुश माणिकराव इंगळे, तर उपाध्यक्षपदी मुक्ताजी किसन जगताप यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक सहकारी अधिकारी ए.एस.बागवान यांनी काम पाहिले, तर सचिव संतोष राऊत यांनी सहकार्य केले.
वाळुंज येथे अध्यक्ष विठ्ठल म्हेत्रे व उपाध्यक्ष निवृत्ती इंगळे यांनी आपल्या पदाचा निर्धारित कालावधी पूर्ण झाल्याने राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी सर्जेराव इंगळे, लक्ष्मण म्हेत्रे, सोनबा भोंगळे, रघुनाथ चोरे, लता इंगळे आदी मान्यवर सदस्य होते.
निवडीनंतर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य रमेश इंगळे, सरपंच कैलास म्हेत्रे, उपसरपंच कैलास इंगळे, माजी उपसरपंच गोविंद इंगळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अंकुश इंगळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेंद्र इंगळे, राहुल इंगळे, राहुल चौरे, शिवाजी म्हेत्रे, ज्ञानेश्वर इंगळे, सुरेश म्हेत्रे आदींनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.