शिवरीत पीक स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान
खळद, ता.१ : शिवरी (ता.पुरंदर)येथे खरीप हंगाम २०२४-२५ पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात तर नवनियुक्त तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांचा शेतकरी, ग्रामस्थ यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. कृषी दिनाच्या निमित्त हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी जाधव वाडी सीताफळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ युवराज बालगुडे, मंडल कृषी अधिकारी अनिल धुरगुडे, चंद्रकांत धायगुडे, महेश कचरे, अमोल सुतार, महेंद्र गिरमे, निकेतन दापटे, दशरथ ढवळे व उदयंत वाघोले, सचिन जगताप, रणजित गुळवे, प्रमोद जगताप, सुनील कामथे, अमर कामथे, शीतल भुजबळ, विजय टेकवडे, स्वाती यादव, प्रीती जगताप आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महाडीबिटी अंतर्गत फळबाग लागवड, शेततळे खोदकाम, शेततळे प्लॅस्टिक अस्तरीकरण तसेच इतर योजनांची माहिती तालुका कृषिअधिकारी श्रीधर चव्हाण यांनी दिली तर सीताफळ पिकाचे लागवड व खत व्यवस्थापन तसेच फळमाशी व्यवस्थापन आणि फळावर येणारी काळी बुरशी यावरील उपाययोजना विषयी मार्गदर्शन युवराज बालगुडे यांनी केले.तर रणजित गुळवे यांनी बांबू पिकाची लागवड व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे व्यवस्थापन परिंचे मंडल विभागातील उप कृषी अधिकारी संदीप कदम, माधवी नाळे, साहाय्यक कृषी अधिकारी अतुल हिंगणे, संदेश समगीर यांच्या सह सर्व सहकाऱ्यांनी केले. सचिन जगताप यांनी सूत्रसंचालन तर अनिल धुरगुडे यांनी आभार मानले.
पीक स्पर्धेतील अनुक्रमे विजेते खालील प्रमाणे :
भात : शांताराम महादेव भोराडे, (सोमुर्डी), संगीता श्याम भोराडे (सोमुर्डी), नवनाथ दिनकर जगताप, (माहुर),
बाजरी: संतोष मारुती शिंदे (पिंगोरी) जनार्दन सीताराम चौधरी, (पिंगोरी), विष्णू सीताराम चौधरी, (पिंगोरी)
सोयाबीन: छबन यशवंत म्हस्के, (नावळी), प्रल्हाद सदाशिव राणे, (जवळार्जुन), साहेबराव कृष्णा म्हस्के, (नावळी)
03124
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.