पाणंद रस्त्यांसाठी विशेष मोहीम राबवा
खळद, ता. ९: महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन (ता. १७) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (ता २) ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवाडा साजरा होणार आहे. यामध्ये जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये पाणंद रस्ते विषयक मोहीम राबविणेचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलिस निरीक्षक, गटविकास अधिकारी, उपअधिक्षक भूमिअभिलेख, मंडल अधिकारी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, महसूल सेवक यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी इत्यादी कामांसाठी तसेच शेतीमाल बाजारात पोचविण्यासाठी बारमाही शेतरस्ते असणे अत्यंत आवश्यक आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीतील कामांसाठी यंत्रसामग्रीचा वापर वाढत असल्यामुळे शेतापर्यंत पोहचण्यासाठी चांगले रस्ते असणे गरजेचे आहे. राज्यात मुळ जमाबंदी वेळी तयार करण्यात आलेल्या नकाशांमध्ये तसेच एकत्रिकरण योजनेवेळी तयार करण्यात आलेल्या गटांच्या गाव नकाशांमध्ये त्यावेळी अस्तित्वात असलेले ग्राम रस्ते, शिव रस्ते, गाडी मार्ग, पायमार्ग इत्यादी दर्शविण्यात आलेले आहेत. मात्र, त्यानंतर वेळोवेळी तयार करण्यात आलेल्या नविन रस्त्यांच्या नोंदी गाव दप्तरी नसल्यामुळे स्थानिक पातळीवर या रस्त्यांच्या वापराबाबत तक्रारी,अतिक्रमण इ. समस्या उद्भवत आहेत.
आदींबाबत होणार शासन निर्णय
१. रस्त्यांचे वर्गीकरण
२ रस्त्यांच्या अधिकार अभिलेखातील नोंदी
३. रस्त्यांना क्रमांक देणे
शासनातर्फे कार्यपद्धती निश्चित
शासन निर्णयानुसार राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडी मार्ग, पाय मार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग व गाडी मार्ग, शेत पाणंद रस्त्यांचे अभिलेख अद्ययावत करणे, त्यावर असलेले अतिक्रमण हटवणे व रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देणे याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
मोहिमेतंर्गत होणार ही कामे
* सर्वेक्षण करणे, नोंदी अद्ययावत करणे
* संबंधितांची संमती घेणे
* रस्ता अदालत घेणे
* मोजणी व सीमांकन करणे
* रस्त्यावरील अतिक्रमणे हटविणे
शासन निर्णय व यानुसार जिल्ह्यात राबवलेला उपक्रम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असून वारंवार शेतकरी रस्ते खुले करण्याची, अतिक्रमणे हटविण्याची मागणी करत आहेत. या निर्णयानुसार शासनाने ज्या अधिकाऱ्यांच्यावर जबाबदारी दिली आहे त्यांनी या नियोजनानुसार कामकाज पूर्ण केले, स्थानिकांनी अधिकचे सहकार्य केले तर शेत रस्त्याच्या अडचणी दूर होतील व सर्वांना हक्काचा रस्ता मिळेल. शासनाच्या निर्णयाबाबत शेतकरी अनभिज्ञ असून जनजागृती येणे गरजेचे आहे.
- अविनाश जाधव, शेतकरी खळद (ता. पुरंदर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.