सासवड बाह्यवळण उड्डाणपुलाचा प्रश्न लागणार मार्गी

सासवड बाह्यवळण उड्डाणपुलाचा प्रश्न लागणार मार्गी

Published on

खळद, ता. १७ : आळंदी ते पंढरपूर या पालखी महामार्गाचे काम पूर्ण होत असताना विविध भागातील नागरिकांच्या मागणीनुसार १० ठिकाणी उड्डाणपूल प्रस्तावित असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली. त्यामुळे सासवड बाह्यवळण चंदन टेकडी व बोरावकेमळा खळद (ता. पुरंदर) येथील उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
सासवड येथे पालखी महामार्गालगतच्या शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न झाली. यावेळी सहाय्यक प्रकल्प संचालक अभिजित औटी, प्रकल्प व्यवस्थापक अजय पाटील, राजेंद्र ढगे, फारुक सय्यद, माणिकराव झेंडे, सुदामराव इंगळे, विजय कोलते, दत्तात्रेय चव्हाण, हेमंतकुमार माहूरकर, राहुल गिरमे, बाळासाहेब भिंताडे, रोहिदास कुदळे, विनोद जगताप, बंडुकाका जगताप, बळवंत गरुड, गौरव कोलते आदी उपस्थित होते.
यावेळी नागरिकांनी बाह्यवळणच्या बाजूने सासवड शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून व्हावे. सासवड- जेजुरी दरम्यान खळद, शिवरी, साकुर्डे, वाल्हे परिसरातील पालखी महामार्गावर पथदिवे व्यवस्था व्हावी. महामार्गावरील खळद उड्डाणपुलाखालील सेवा रस्त्यावर व पालखी मार्गालगत बंदिस्त गटारांची व्यवस्था व्हावी. स्थानिक व बाधित शेतकऱ्यांना पूर्ण टोल माफी मिळावी. पालखी महामार्गालगत बाधित शेतकरी कोणताही व्यवसाय करताना महामार्ग प्राधिकरणाने कोणतेही शुल्क न आकारता सशर्त परवानगी द्यावी. शिवरी येथे वाळुंज फाट्यावर मंजूर भुयारी मार्गाचे काम तातडीने सुरू करावे, अशा मागण्या केल्या.

नागरिकांना मिळाले आश्वासन
दहा दिवसांत वाळुंज फाट्यावर भुयारी मार्गाचे काम सुरू करण्याचे प्राधिकरण पदाधिकाऱ्यांचे आश्वासन.
वास किलोमीटर परिसरातील शेतकऱ्यांसाठी मासिक पासची सुविधा मिळणार.
स्थानिक शेतकऱ्यांना संपूर्ण टोलमाफी मिळावी व बाधित शेतकऱ्यांना व्यवसायात करताना कोणतेही शुल्क न आकारता सशर्त परवानगी द्यावी यासाठी केंद्रीय कार्यालयात पाठपुरावा करणार असल्याचे खासदार सुळे यांची ग्वाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com