पुणे
शिवरी येथील विद्यालयात अभिवादन
खळद, ता. २८ : शिवरी (ता. पुरंदर) येथे रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा ज्योतिराव फुले विद्यालय व शंकरराव मुकुटराव कामथे कनिष्ठ महाविद्यालयात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३८ व्या जयंती निमित्ताने प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य रमेश महाडीक,संजय गोसावी, नितीन कोलते, प्रवीण भटकर, माधुरी ढोणे, जयश्री गोरडे,सारिका टिळेकर, जीविता कदम, शबनम पठाण, सोनाली भोपळे, शीतल पांडवे, वंदना मडके, शिल्पा रायकर, कविता टिळेकर, उज्ज्वला लोळे, गणपत खरात, संभाजी कोलते यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.