भैरवनाथ पाणी वाटप संस्थेवर राष्ट्रवादीचा झेंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भैरवनाथ पाणी वाटप संस्थेवर राष्ट्रवादीचा झेंडा
भैरवनाथ पाणी वाटप संस्थेवर राष्ट्रवादीचा झेंडा

भैरवनाथ पाणी वाटप संस्थेवर राष्ट्रवादीचा झेंडा

sakal_logo
By

कडूस, ता. ३१ : कडूस (ता. खेड) येथील भैरवनाथ सहकारी पाणी वाटप संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला. संस्थेच्या अध्यक्षपदी दिलीप ढमाले, तर उपाध्यक्षपदी माऊली ढमाले व सचिवपदी संतोष गारगोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

खेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पाणी वाटप संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकएकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. बिनविरोध निवडणुकीसाठी उद्योजक प्रताप ढमाले, अभिनाथ शेंडे, सरपंच शहनाज तुरुक, माजी सरपंच निवृत्ती नेहेरे, पंडित मोढवे, बाळासाहेब धायबर, अशोक बंदावणे, बाळासाहेब बोंबले, बबलू शेख, नंदकुमार जाधव, बाजीराव शिंदे, बाजीराव गारगोटे आदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. निवडणुकीसाठी नवनिर्वाचित संचालक पांडुरंग गारगोटे, रत्नाकर डांगले, ज्ञानेश्वर ढमाले, प्रकाश जगताप, अनिल जाधव, संतोष गारगोटे, सुदाम ढमाले, कमल नेहेरे, अनीता ढमाले, बाळकृष्ण चिपाडे, पंडित पोटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अर्जुन मलघे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संस्थेचे सचिव किसन गारगोटे यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्यांचा सन्मान करण्यात आला. निकालानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंद साजरा केला. आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शेतकरी सभासदांना विचारात घेऊन शेतीला मुबलक पाणी तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ढमाले यांनी सांगितले.

00959