गारगोटवाडी येथे धावले चारशे बैलगाडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गारगोटवाडी येथे धावले चारशे बैलगाडे
गारगोटवाडी येथे धावले चारशे बैलगाडे

गारगोटवाडी येथे धावले चारशे बैलगाडे

sakal_logo
By

कडूस, ता.१५ : गारगोटवाडी (ता.खेड) येथे ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीत चारशे बैलगाडे धावले. शर्यतीचा थरार पाहण्यासाठी मोठी नागरिकांची गर्दी झाली होती. शर्यतीच्या पहिल्या दिवशी निवृत्ती नामदेव नेहेरे (कडूस) तर दुसऱ्या दिवशी कै.बारकू गोपाळा करवंदे (वाशेरे) यांच्या बैलगाड्याने ''घाटाचा राजा'' हा किताब पटकावला, अशी माहिती यात्रा कमिटीचे जितेंद्र काळोखे यांनी दिली.
ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांच्या मूर्तीस अभिषेक व हारतुरे अर्पण केल्यानंतर बैलगाडा घाटाचे पूजन सरपंच वर्षा मनोहर बच्चे यांच्या हस्ते झाले. बैलगाडा शर्यतीत पहिल्या क्रमांकासाठी ६६ हजार, दुसऱ्यासाठी ५५ हजार, तिसऱ्यासाठी ४४ हजार, चौथ्या क्रमांकासाठी ३३ हजार तर पाचव्या क्रमांकासाठी २२ हजार रुपये बक्षीस होते. त्याच बरोबर दोन दुचाकी, कडबा कुट्टी व पीठ गिरणीसह रोख स्वरूपातील अनेक वैयक्तिक बक्षीसे होती. पहिल्या क्रमांकाच्या बक्षिसासाठी एकूण ३५, दुसऱ्यासाठी एकूण ८४, तिसऱ्यासाठी एकूण ७९, चतुर्थ क्रमांकासाठी एकूण ४२ तर पाचव्या क्रमांकाच्या बक्षिसासाठी २१ बैलगाडे पात्र ठरले. या बैलगाडा मालकांना बक्षीस विभागून देण्यात आले. पहिल्या दिवशी ''फायनल सम्राट'' म्हणून योगेश मच्छिंद्र कदम (पिंपळे गुरव) तर दुसऱ्या दिवशी बी.टी.कंपनी (मंचर) यांचा बैलगाडा ठरला. माजी खासदार शिवाजी आढळराव, बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख भगवानराव पोखरकर, उद्धव ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख संजय घनवट, राष्ट्रवादीचे प्रताप ढमाले, अभिनाथ शेंडे, माजी सभापती रामदास ठाकूर, दिलीप मेदगे आदी मान्यवरांनी उत्सवास भेट दिली. उत्सवाचे नियोजन समस्त ग्रामस्थ मंडळी व पुणेकर तसेच मुंबईकर ग्रामस्थ मंडळींनी केले होते. पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बीट अंमलदार संतोष घोलप व पोलीस कर्मचाऱ्यांनी उत्सव कालावधीच्या दोन्ही दिवशी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

00990