शासकीय योजनांचा ८२९ जणांना लाभ

शासकीय योजनांचा ८२९ जणांना लाभ

कडूस, ता. १: कडूस (ता.खेड) येथे विविध शासकीय योजनांची माहिती व योजनांचा लाभार्थ्यांना थेट लाभ मिळवून देण्यासाठी ''शासन आपल्या दारी'' या उपक्रमांतर्गत शिबिर पार पडले. यावेळी ८२९ जणांना लाभ मिळाला, अशी माहिती महसूल विभागाच्या मंडलाधिकारी सारिका विटे व तलाठी बाळासाहेब राठोड यांनी दिली.

उपक्रमांतर्गत विविध कार्यालयांकडून शासकीय योजनांची माहिती, त्यांचे लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत मंगळवारी (ता.३०) शिबिराचे पार पडले. अप्पर तहसीलदार तथा उपजिल्हाधिकारी हरेश सुळ यांच्या हस्ते शिबिराचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी मंडलाधिकारी सारिका विटे, तलाठी बाळासाहेब राठोड, सरपंच शहनाज तुरुक, दोंदेचे सरपंच चंद्रकांत बारणे, दोंदे सोसायटीचे अध्यक्ष माऊली कदम, ग्रामपंचायत सदस्य लता ढमाले, गणेश मंडलिक, विजया नाईक, अभि शेंडे, नंदू जाधव, ज्योती राक्षे, मोहिनी सावंत, माधुरी रावते, वनपाल डी.डी.फापाळे उपस्थित होते.
या शिबिरात लाभार्थींचे परिपूर्ण प्रस्ताव जमा करून घेतले. कृषी, आरोग्य, पशुसंवर्धन, वन, पोस्ट खाते व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. महसूल विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, तहसीलदार उत्पन्न दाखला वितरण, नवीन रेशनकार्ड वाटप, सातबारा फेरफार वाटप, अन्य महसूल प्रकरण अहवाल वितरित करण्यात आले. कृषी विभागाच्या वतीने विविध लाभाच्या योजनांची माहिती देण्यासह लाभार्थी शेतकऱ्यांचे अर्ज दाखल करून घेतले. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जनावरांचे लसीकरण, जंत निर्मूलन, वांजतपासणी करण्यात आली. आरोग्य विभागाच्या वतीने रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणीसह औषध वाटप व पोस्ट खात्याच्या कर्मचाऱ्यांनी आधार जोडणी केली. सूत्रसंचालन चांगदेव ढमाले यांनी केले, तर मंडलाधिकारी सारिका विटे यांनी आभार मानले.


01035

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com