‘कुमंडला’तील उपशाची पाणीपट्टी माफ करा

‘कुमंडला’तील उपशाची पाणीपट्टी माफ करा

Published on

कडूस, ता. ५ : कडूस (ता.खेड) येथील कुमंडला नदीवरील लघु पाटबंधारे विभागाच्या बंधाऱ्यातील पाण्याचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामातील पाणीपट्टी कर आकारणी रद्द करण्यात यावी, अशी मागणी भैरवनाथ सहकारी पाणी वाटप संस्थेने केली आहे.

शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव संस्थेने पाटबंधारे विभागाकडे पत्रव्यवहार केला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष दिलीप ढमाले व सचिव किसनराव गारगोटे यांनी दिली. कडूस येथील कुमंडला नदीवरील बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता २.६२ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. या पाण्यावर कडूस व परिसरातील बहुतांश शेती अवलंबून आहे. बंधाऱ्यातील पाणी वापरावर लघु पाटबंधारे विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली भैरवनाथ सहकारी पाणी वाटप संस्थेचे नियंत्रण आहे. पाणी वापरासाठी सुमारे ४५० शेतकऱ्यांची मागणी आहेत. ४५० हेक्टरवरील पिकांना पाणी दिले जाते. यंदाच्या वर्षी अतिप्रमाणात पाऊस झाला. सततच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरीप हंगाम हातातून गेला आहे. उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे. खरिपातील पिकांसाठी शेतकऱ्यांना यंदाच्या वर्षी बंधाऱ्यातील पाण्याचा वापर करावा लागला नाही. बंधाऱ्यातील पाणी एकाही शेतकऱ्याने विद्युत पंपाद्वारे उपसले नाही. अगोदरच अतिपावसामुळे पिकांच्या नुकसानीने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे, त्यातच बंधाऱ्यातील पाणी वापराबाबत पाणीपट्टीच्या करआकारणीची टांगती तलवार लाभधारक शेतकऱ्यांना भेडसावत आहे. खरीप हंगामातील पाणीपट्टीची पूर्णपणे सूट द्यावी, अशी मागणी लाभधारक शेतकऱ्यांची आहे. त्यानुसार भैरवनाथ सहकारी पाणी वाटप संस्थेने पाटबंधारे विभागाकडे शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com