जऊळके परिसरात बेकायदेशीर वृक्षतोड

जऊळके परिसरात बेकायदेशीर वृक्षतोड

Published on

कडूस, ता. १३ ः जऊळके खु. (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व स्मशानभूमी परिसर, तसेच टाकळकरवाडी आणि रेटवडी शीव मार्गावरील दोन्ही बाजूच्या सुमारे २०० ते ३०० वृक्षांची बेकायदेशीर तोड केली असून, संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते कांतीराम बोऱ्हाडे यांनी केली आहे. याबाबत बोऱ्हाडे यांनी तहसीलदार कार्यालय, वनविभाग व पर्यावरण मंत्री यांच्याकडे निवेदन दिले आहे.
येथील स्मशानभूमी व जिल्हा परिषद शाळा परिसरातील झाडे तोडली आहेत. तसेच, टाकळकरवाडी ते जऊळके खु. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या मोठ्या वृक्षांची कत्तल केली आहे. त्याचसोबत जऊळके खु. ते रेटवडी शीव या मार्गावरील सुद्धा दोन्ही बाजूच्या वृक्षांची मुळासकट कत्तल केली आहे. अनेक वर्षांपासूनच्या वृक्षांची तोड केल्याने नैसर्गिक साधन संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आर्थिक लाभासाठी पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी झाली असल्याची तक्रार बोऱ्हाडे यांनी पर्यावरण मंत्र्यांकडे केली आहे. ही संपूर्ण वृक्षतोड बेकायदेशीर असून, तक्रारीनंतर परवानगीची कागदपत्रे रंगवली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
याबाबत राजगुरुनगर वनपरिमंडलचे वनरक्षक संतोष बिरादार म्हणाले, ‘‘शाळा व स्मशानभूमी परिसरासह गावात बिबट्याला लपण्याची जागा उपलब्ध होईल, अशा परिसरातील वृक्षतोडीला परवानगी होती. टाकळकरवाडी व रेटवडी शीव मार्गावरील वृक्षतोडीची माहिती घेणार आहे. झाडांची संख्या मात्र २०० ते ३०० नसेल, कमी असेल. तक्रारीची चौकशी केली जाईल.’’

02073

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com