गारगोटवाडीची ग्रामसभा सलग तिसऱ्यांदा तहकूब

गारगोटवाडीची ग्रामसभा सलग तिसऱ्यांदा तहकूब
Published on

कडूस, ता. १० : खेड तालुक्यातील गारगोटवाडी येथे खाणपट्टा व खडी क्रशरच्या ना हरकत दाखल्यासाठी गुरुवारी (ता. ९) आयोजित केलेली विशेष ग्रामसभा प्रशासनाने ऐनवेळी पुन्हा तहकूब केली. प्रशासनाने सलग तिसऱ्यांदा असा निर्णय घेतल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
गारगोटवाडी येथील खाणपट्टा व स्टोन क्रशर व्यवसायासाठी ग्रामसभेने यापूर्वीच ना हरकत दाखला नाकारला होता. यावर संबंधित व्यावसायिकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितल्यानंतर, प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली फेरखातरजमेसाठी विशेष ग्रामसभा घेण्याचे आदेश देण्यात आले होते. यापूर्वी १८ सप्टेंबर २०२५ आणि १५ जानेवारी २०२६ रोजी अशाच प्रकारे सभांचे आयोजन करण्यात आले होते, मात्र त्याही वेळी सभा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. गुरुवारी सकाळी ११ वाजता सभेची वेळ असताना, साडेअकरा वाजता ग्रामसेवकामार्फत सभा तहकूब झाल्याचा तोंडी निरोप देण्यात आला. वारंवार कामधंदा सोडून सभेला येणाऱ्या ग्रामस्थांना प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत लेखी सूचना दिली जात नसल्याने संशय व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून जाणीवपूर्वक ग्रामस्थांची दिशाभूल करून व्यावसायिकाला मदत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप माजी उपसरपंच जितेंद्र काळोखे व ग्रामस्थांनी केला आहे.

प्रांताधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक लागली, यामुळे तिकडे जावे लागले. ग्रामसभा पुढे ढकलल्याचे अधिकृत पत्र काढता आले नाही. ग्रामस्थांना तोंडी कळवले आहे. प्रांताधिकारी आल्यावर पत्रावर स्वाक्षरी होईल.
- रवींद्र मोरे, नायब तहसीलदार, प्रांताधिकारी कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com