माळरानावरील जैवविविधतेच्या संवर्धनाची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माळरानावरील जैवविविधतेच्या संवर्धनाची गरज
माळरानावरील जैवविविधतेच्या संवर्धनाची गरज

माळरानावरील जैवविविधतेच्या संवर्धनाची गरज

sakal_logo
By

सचिन लोंढे : सकाळ वृत्तसेवा
कळस, ता. १४ : नादमधूर चिव चिवाट... चित्तवेधक कसरती...मनमोहक सौंदर्य... असे मंत्रमुग्ध करणारे आल्हाददायक वातावरण जिल्ह्यातील बहुतांश माळरानावर पक्षिप्रेमींना गुलाबीथंडीत अनुभवयास मिळत आहे. पिवळसर आणि दगड- गोट्यांच्या मैदानांवर निसर्गदेवतचे वरदान लाभलेल्या अनेकविध पक्ष्यांची मांदियाळी तसेच जैवविविधता
उपजीविका करताना दृष्टीस पडत आहेत. पण मानवी हस्तक्षेपामुळे माळरानावर बसेरा करणाऱ्या पंचवीस ते तीस प्रजातींच्या अनोख्या दुनियेस बाधा पोहोचत आहेत. या जैवविधितेचे
संवर्धन करून ते जतन करणे काळाची गरज बनले आहे.

किटकामागे धावणारे, उडणाऱ्या कीटकांना शक्य तितक्या कसरती करून पकडणारे, छोटे दगड-गोटे उचकटून त्याखालील कीटक पकडणारे, मातीमध्ये धूळ स्नान करणारे छोटे-छोटे जीव नजरेस पडतात. यामध्ये मुरारी, डोंबारी, तुरेबाज चंडोल, मलबारी चंडोल, चंडोल, नीलकंठ, माळटिटवी, तीतर, धाविक, हुद हुद, रातवा, गांधारी, गप्पीदास, करडा भारीट, रणगोजा, चीरक, रंगीत पंखुर्डी, होला अशा प्रकारचे पक्षी कॅमेऱ्याच्या दुर्बिणीतून नजरेत भरतात.

स्थलांतरीत पक्ष्यांचा अधिवास
सरकारी दरबारी पडीक जमीन, गायराने ही वेगळी असली तरी निसर्गातील तितकीच महत्त्वाची परिसंस्था आहेत. वाढत्या शहरीकरणात जिल्ह्यातील माळराने नष्ट होवू लागल्याचे वास्तव असून, अन्नसाखळीतील प्रत्येक जिवाचे संवर्धन काळाची गरज बनले आहे. भारिट, रणगोजा, रंगीत गप्पीदास, भोवत्या यांसारखे काही पक्षी स्थलांतर करून जिल्ह्यात अधिवास करत आहेत.

भकास माळरान असतात बोलके
निसर्ग संपन्न गावांत सिमेंटची जंगले उभी राहू लागली आहेत. मात्र, सिमेंटची जंगले उभी करताना निसर्गनिर्मित माळराने नामशेष झाली आहेत. पर्यायाने माळरानावर वास्तव्यास असलेले लहान-मोठे जीव नष्ट होत आहेत. मात्र, दुरून भकास दिसणारे माळरान प्रत्यक्षात जावून अनुभवल्यानंतर बोलके असल्याचे जाणवते. हा अनमोल ठेवा वन विभागाने पक्षी अभ्यासक तसेच स्थानिकांच्या मदतीने वाचविण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे पक्षी अभ्यासक दत्तात्रेय लांघी यांनी ''सकाळ''शी बोलताना सांगितले.

यामुळे होतायेत अनेक जीव
१. माळराणांवर असलेले सुके गवत
२. मानवनिर्मित किंवा विजेच्या तारांमुळे लागलेला वणवा
३. हिरवेगार असलेले डोंगरमाळ पिवळे
४. उन्हाची तीव्रतेमुळे वाळलेले गवत.

माळावर सर्रासपणे आढळणाऱ्या पक्ष्यांच्या काही प्रजाती आपल्या भागातून गायब झाल्याच्या आढळून येतात. यामध्ये प्रामुख्याने तणमोर व माळढोक या पक्ष्यांचा समावेश आहे. माळरानाचे सौंदर्य खुलवण्यासाठी माळावरील पक्ष्यांना विशेष महत्त्व आहे. माळरानावरील जैवविविधतेच्या संवर्धनाची माहिती शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना देणे गरजेचे बनले आहे.
- दत्तात्रेय लांघी, पक्षी अभ्यासक, स्पंदन पर्यावरण राष्ट्रीय विकास संस्था

इंदापूर तालुक्यातील जाळपट्टे करुन वणवा रोखण्याचे प्रयत्न केले जातात. यातून वनातील माळरानांवरील जैवविविधतेचे संवर्धन होण्यास हातभार लागला आहे. खासगी माळरानांवरील जैवविविधता टिकविण्यासाठी प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. निसर्ग जपण्यासाठी शासन व नागरिकांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक आहे.
- अशोक नरुटे, वनपाल
01634, 01635, 01633, 01642, 01640, 01641, 01638, 01637