उजनी करणार आज उपयुक्त साठ्यात प्रवेश

उजनी करणार आज उपयुक्त साठ्यात प्रवेश

पळसदेव, ता. ३१ : उजनी धरणातील पाणी पातळीची वाटचाल मृतसाठ्यातून उपयुक्तसाठ्याकडे सुरू आहे. धरणाची पातळी उद्या (ता.१) मृतसाठ्यातून उपयुक्त साठ्यात प्रवेश करेल. सध्या धरणात ६३ टीएमसी मृत पाणीसाठा झाला आहे. उपयुक्त पाणी साठ्यात प्रवेश करण्यासाठी आणखी सुमारे ०.६२ टीएमसी पाण्याची गरज आहे.

यंदा मॉन्सूनपूर्व पावसाने हुलकावणी दिली आहे. याशिवाय मॉन्सूनचे दमदार पाऊस धरणक्षेत्रात झालेले नाहीत. पुण्यातील धरणांच्या ओव्हरफ्लोमुळे येणारा विसर्ग उजनी जलाशयात अडविला जातो. धरण शंभर टक्के भरल्यानंतर ११७ टीएमसी पाणी साठा होतो तर १११ टक्के भरल्यानंतर धरणात सुमारे १२३ टीएमसी पाणी अडविले जाते. या साठ्यापैकी सुमारे ५३.५७ टीएमसी पाणी साठा उपयुक्त साठा असतो. यंदाही ऑगस्टमध्ये धरण शंभर टक्के भरण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

पुण्यालगतच्या चासकमान, खडकवासला, कासारसाई, वडिवळे या धरणांतून उजनीमध्ये १२ हजार ८८० क्युसेकने पाण्याचा विसर्ग येत आहे. यामुळे धरण उद्यापर्यंत मायनसमधून प्लसमध्ये प्रवेश करेल. धरणक्षेत्रात आतापर्यंत दोनशे मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला आहे. मात्र धरण हे पुण्यातील पावसावर अवलंबून आहे. धरणातून सध्या कोणताही विसर्ग सुरू नाही. मात्र, पुढील काळात पावसाने ओढ दिल्यास मृत साठ्यातील सुमारे ४४ टीएमसीपर्यंत पाणी वापरता येणे शक्य आहे.
-रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता, उजनी धरण

धरणाच्या पाणी पातळीकडे सर्वांचे लक्ष
शेती व शेतीपूरक उद्योग, चाळीसहून अधिक खासगी व सहकारी साखर कारखाने, डझनभर औद्योगिक वसाहती, कोट्यवधींची उलाढाल असलेला मासेमारी व्यवसाय या जलाशयावर अवलंबून आहे. सुमारे तीस हजार कोटींहून अधिकचे अर्थकारण अवलंबून असलेल्या या धरणाच्या पाणी पातळीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com