farmer
farmer sakal

Agro News : शेतकऱ्यांचे प्रपंच उद्‌ध्वस्त होण्याची शक्यता

पावसाने ओढ दिल्यास वर्षभरातील पाण्याचे नियोजन कोलमडण्याची शक्यता बॅक वॉटरलगतचे शेतकरी व्यक्त करत आहेत.

पळसदेव - उजनी धरणातून आकस्मिक पाणी आरक्षण समितीच्या आदेशाने सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर व औस बंधारा भरण्यासाठी सुमारे पाच टीएमसी पाणी नदीव्दारे सोडण्यात येणार आहे. हा निर्णय नदीलगतच्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा असला, तरी याबाबत बॅकवॉटरलगतच्या शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राजकीय स्वार्थातून घेतलेल्या निर्णयाने शेतकऱ्यांचे प्रपंच उद्‌ध्वस्त होण्याची शक्यता आहे. आगामी काळात सर्वांवर पाणी टंचाईची टांगती तलवार राहील, अशी भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त करत आहेत.

पावसाने ओढ दिल्यास वर्षभरातील पाण्याचे नियोजन कोलमडण्याची शक्यता बॅक वॉटरलगतचे शेतकरी व्यक्त करत आहेत. उजनी धरणातील जलसाठा सध्या २४ टक्के झाला आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यापैकी पाणी देण्यात येणार आहे. सध्या उजनी धरणातील पाणीसाठा ७६.४१ टीएमसी म्हणजे २४ टक्क्यांवर गेला आहे. यामध्ये सुमारे ६३ टीएमसी पाणीसाठा हा मृतसाठा आहे. उर्वरित १३ टीएमसी उपयुक्त साठा आहे. या साठ्यापैकी सुमारे ५ टीएमसी पाणी नदीतून सोडण्यात येणार आहे. उजनीत येणारा पाण्याचा विसर्ग सध्या नगण्य आहे. याशिवाय पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. पावसाच्या विश्रांतीमुळे शेतकऱ्यांची पाण्याची मागणी वाढली आहे. बॅकवॉटरलगतच्या शेतकऱ्यांचा तर जीव टांगणीला लागला आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी तुकाराम मुंढे असताना २०१५ मध्ये उद्भवलेली टंचाईची परिस्थिती त्यांनी कौशल्याने हाताळली होती. त्यावेळी धरणात १६ टक्के पाणी साठा असताना, त्यांनी वर्षभर पाणी पुरविण्याचे नियोजन केले होते. मात्र, त्यांच्यानंतर अद्यापपर्यंत कौशल्याने पाणी नियोजन करण्याचे धाडस कोणी केले नाही. यंदा टंचाईची परिस्थिती आहे. यातच नदीतून एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्याचा निर्णय घेणे म्हणजे, दुष्काळात तेरावा महिना या उक्तीप्रमाणे धरणावर अवलंबून असणाऱ्यांना पुढील काळात समस्या निर्माण करण्यासारखे होईल.
अरविंद जगताप, अध्यक्ष, उजनी धरणग्रस्त बचाव कृती समिती

farmer
Pune News : गृहनिर्माण सोसायटीमध्येही स्थापन होणार तंटामुक्ती समिती : उपनिबंधक संजय राऊत

उजनीच्या बॅकवॉटरवर अवलंबून असलेल्या व धरणासाठी जमिनी दिलेल्या विस्थापितांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. उजनी धरणातून नदीत पाच टिएमसी पाणी सोडण्याचा निर्णय म्हणजे वोटबँकेचे तात्पुरते समाधान करण्याचा निर्णय आहे. वास्तविक धरण पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय नदीतून पाणी सोडता येत नाही. यामुळे नदीतून पाणी सोडल्यास धरणग्रस्तांच्या माध्यमातून आंदोलन उभारण्याची आमची तयारी आहे
भूषण काळे, संचालक, कर्मयोगी सहकारी साखर कारखाना

farmer
SSC GD Constable Exam : सीएपीएफ शिपाई भर्तीची परीक्षा 10 जानेवारीपासून, तब्बल 50 हजार जागांसाठी भर्ती

पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, सोलापूर व नदीलगतच्या ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांसाठी नदीतून पाणी सोडण्याबाबत आकस्मिक पाणी आरक्षण समितीच्या आदेशाने पाणी सोडण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत पाणी सोडण्याचे नियोजन असून, नदी कोरडी असल्याने पंढरपूर व औस बंधारा भरण्यासाठी किमान पाच टीएमसी पाण्याची गरज भासणार आहे.
रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता, उजनी धरण

farmer
PM Modi: 'D येणार आणि C जाणार..', 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे पंतप्रधान मोदींचा फॉर्मूला काय आहे? जाणून घ्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com