टिळक, साठे यांच्या प्रतिमांचे पूजन
पळसदेव, ता. १ : स्वातंत्र्यलढ्यातील महान स्वातंत्र्यसेनानी, तत्वज्ञ राजकारणी तथा देशभक्त लोकमान्य टिळक यांच्या पुण्यदिनानिमित्त आणि लोकशाहीर, लोककवी, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पळसदेव (ता.इंदापूर) येथील पळसनाथ विद्यालयात प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.
ब्रिटिश राजवटीविरुद्ध आपल्या लेखणीतून भारतीयामध्ये असंतोष निर्माण करत स्वातंत्र्याची प्रेरणा टिळकांनी निर्माण केली. समाजातील कष्टकरी, कामगार, दलित, उपेक्षित वर्गाच्या दुःख, यातना आपल्या लेखणीतून मांडत कथा कादंबरी लोकनाट्य, पोवाडे प्रवासवर्णने आदी विपुल साहित्यसंपदा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी रचली.
दरम्यान, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयातील संपत येडे होते.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य विकास पाठक, पर्यवेक्षक संजय जाधव, अशोक जाधव, सुरेश बनकर, अविनाश शेलार, संदीप काळे, सिकंदर देशमुख, नितीन जगदाळे, वृषाली काळे, सुवर्णा नायकवडी प्रतिभा कांबळे, उज्ज्वला वाघमारे, शुभांगी कोळी, सुदर्शना पवार, कीर्ती गायकवाड, अमृता गवळी, निकिता पवार, प्रियांका ढगे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संतोष पवार यांनी सूत्रसंचालन तर तानाजी इरकल यांनी आभार मानले.
02594
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.