कानगाव श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी

कानगाव श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी

कानगाव (ता. दौंड) येथील श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी मंदिर सर्व ग्रामस्थांच्या एकतेचे प्रतीक आहे. सर्व ग्रामस्थ मंदिरातील सर्व उत्सव एकत्र येत मोठ्या उत्साहात साजरी करतात. सांस्कृतिक वारसा जतन करणारी आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारी पुण्यभूमी म्हणून कानगावला तालुक्यात ओळखले जाते.

श्री भैरवनाथ माता जोगेश्वरी मंदिर कानगाव
कानगाव व पंचक्रोशीतील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री भैरवनाथ माता जोगेश्वरी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सध्या सुरू आहे. सुरुवातीला पांडवकालीन दगडी मंदिर होते, त्याचा जिर्णोद्धार करून दोन मजली माडीचे मंदिर बांधण्यात आले. आता त्याही मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून दगडी कोरीव नक्षीकाम करून नव्याने बांधकाम सुरू आहे. या मंदिरामध्ये श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा ३-३-२०२४ रोजी झाला. तसेच श्रींच्या कलशारोहण सोहळा २६-४-२०२४ रोजी झाला. या काळामध्ये भाविक भक्तांनी मोठ्या श्रद्धेने श्रींचे कलश मिरवणूक संपूर्ण गावातून काढली. त्यानंतर कलशधान्य निवास, कलशाभिषेक, पूजा, हवन, विधी झाली व कलशारोहण सोहळा झाला.

यात्रेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची आयोजन
दरवर्षी चैत्र कृ द्वादशीला श्री भैरवनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सव होतो. यात्रेनिमित्त सर्व पंचक्रोशीतील तसेच परगावी राहणारे भाविक भक्त यात्रेसाठी उपस्थित राहतात. गावामधून श्रींच्या छबिना निघतो. दरवर्षी माघ पौर्णिमेला तसेच दसरा या सणांना श्रींची गावांमधून मिरवणूक निघते. यात्रेनिमित्त लोकनाट्याच्या मनोरंजांचा कार्यक्रम होतो. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी परिसरातील नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचा आखाडा भरतो. मल्लांना बक्षीसह सन्मानित करण्यात येते. यात्रेबरोबरच वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम ग्रामस्थांच्या सहभागातून साजरे होतात. रोज पहाटे आरती व दर रविवारी संध्याकाळी आरती केली जाते. दर रविवारी भजन केले जाते. कोणाला विंचू अथवा सर्पदंश झाल्यास पूर्वी त्यास ग्रामदैवताच्या मंदिरामध्ये आणून भैरवनाथ व माता जोगेश्वरीच्या मूर्ती पुढे बसून घंटानाद केला जायचा, विशेष म्हणजे दंश झालेली व्यक्ती बरी व्हायची. तसेच जो कोणी मनापासून या देवाची पूजा करील, त्यासाठी देव धावून जातो, असे गावातील ज्येष्ठ नागरिक आवर्जून सांगतात. आता विज्ञान युगासह पुढे जात असल्यामुळे असे प्रयोग कोणी करत नाही.

मंदिराचे सुशोभीकरण
श्री भैरवनाथ मंदिरामध्ये श्रींचे सिंहासन हे मखराना मार्बलमध्ये अतिशय सुंदर नक्षीकाम करून बनवले आहे. तसेच कळस व खिडक्या या लाल रंगाच्या बन्सी पहाडपूर दगडामध्ये बनविले आहेत. मंदिराच्या जीर्णोद्धारसाठी निधी संकलन सुरू आहे.
श्री भैरवनाथ माता जोगेश्वरींचे अतिशय देखणे, असे दगडी नक्षीदार कोरीवकाम करून मंदिराचे बांधकाम सुरू आहे. तसेच दगडी संरक्षण भिंत व दीपमाळ काम सुरू आहे. जीर्णोद्धार कामासाठी निधी संकलन सुरू आहे, तरी या शुभ कार्यासाठी सर्व भैरवनाथ भक्तांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com