श्री भानोबा सोसायटीच्या अध्यक्षपदी शितोळे
कानगाव, ता. ५ : कुसेगाव (ता. दौंड) येथील श्री भानोबा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी राजाराम भगवान शितोळे व उपाध्यक्षपदी स्वाती सुनील शितोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष सुरेश परशुराम शितोळे व उपाध्यक्ष शीतल भास्कर शितोळे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागी या निवडी करण्यात आल्या. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक एस. एस. शिंदे यांनी काम पाहिले. यावेळी सोसायटी चे सचिव प्रताप शितोळे हे उपस्थित होते.
या निवडीप्रसंगी श्री भानोबा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी संचालक विजयसिंह शितोळे, विकास शितोळे, बाळासो शितोळे, अनिल शितोळे, सुरेश शितोळे, गजानन शितोळे, नवनाथ रूपनवर, बाळासो सोनवणे, शीतल शितोळे आदी उपस्थित होते.
तसेच कुसेगावचे ग्रामस्थ दादासो शितोळे, शिवाजी शितोळे, प्रभाकर शितोळे, नितीन शितोळे, गणेश शितोळे, कमलाकर शितोळे, गोरख शितोळे, भास्कर शितोळे, सुनील शितोळे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.