ऊस वाहतूकदारांकडून नियमांची पायमल्ली

ऊस वाहतूकदारांकडून नियमांची पायमल्ली

Published on

कानगाव, ता.१६ : चालू वर्षाच्या ऊस गाळप हंगामाला जोरदार सुरुवात झाली असून दौंड तालुक्यातील पाटस व परिसरातून शेतकरी उसाची वाहतूक विविध साखर कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणावर करत आहेत. मात्र, या वाहतुकीत सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक भागांत वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरून वाहतूक होत आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरून साखर कारखान्यांकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर ट्रॅक्टरला अनधिकृतपणे दुसरी ट्रॉली लावून क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरून सर्रास वाहतूक केली जात आहे.
विना वाहन नंबर असलेल्या ट्रॉल्या तसेच एका ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या जोडून, सहा व दहा टायरच्या ट्रकद्वारे, बैलगाड्यांनी उसाची वाहतूक सुरू आहे. बहुतेक वाहनांवर रिफ्लेक्टर नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. रात्रीच्या वेळेस अंधारात अशा वाहनांची ओळख पटविणे कठीण जात असून, मागून जाणाऱ्या वाहनांसाठी ही वाहने धोकादायक ठरत आहेत. दौंड तालुक्याला भीमा नदीचा मोठा पट्टा आहे ‌या पट्ट्यामध्ये उसाचे क्षेत्र असल्याने या भागातून भीमा सहकारी साखर कारखाना, दौंड शुगर कारखाना, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना, तसेच बारामती तालुक्यातील सोमेश्वर व माळेगाव साखर कारखान्याकडे उसाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा सुरू आहे. त्यामुळे या मार्गांवर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची रेलचेल सुरू आहे. मात्र, वाहनांना वेगमर्यादा नसणे, कर्णकर्कश हॉर्नचा वापर आणि दिवसरात्र सुरू असलेली वाहतूक यामुळे रस्त्यांवरून जाणाऱ्या सामान्य नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ऊस वाहतुकीत सुरक्षा उपायांची अंमलबजावणी होत नसल्याने अपघातांचे धोका वाढला आहे . दरम्यान,आरटीओ विभागाने वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

00684

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com