वरवंडचा प्रणय टेंगले ठरला ‘दौंड मल्लसम्राट’

वरवंडचा प्रणय टेंगले ठरला ‘दौंड मल्लसम्राट’

Published on

कानगाव,ता. १२ : दौंड तालुका निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचा मानाचा ‘दौंड मल्लसम्राट’ किताब रोख पाच हजार एक रुपयांचे बक्षीस वरवंड गावच्या प्रणय प्रकाश टेंगले याने पटकावले.
कानगाव (ता. दौंड) येथे रविवारी (ता. ११) ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा २०२६ साठीची दौंड तालुका निवड चाचणी कुस्ती स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत तालुक्यातील बालगट, वरिष्ठ गादी व माती विभागातील कुस्तीपटूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवीत आपली ताकद आजमावत डावपेच व कौशल्य दाखवून दिले. तर कुस्ती शौकिनांनी कुस्तीपटूंवर बक्षिसांची खैरात केली. दरम्यान, डॉ. भरत खळदकर यांच्या वतीने घोषित करण्यात आलेले रोख पाच हजार एक रुपयांचे बक्षीस टेंगलेने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर पटकावले. तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडू हा सन्मान पाटस येथील पोपट लक्ष्मण बरकडे याला प्रदान करण्यात आला. ‘दौंड तालुक्यातील उदयोन्मुख खेळाडू’ चा पुरस्कार पिंपळगाव येथील राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवणाऱ्या गुणवंत कुस्तीपटू शुभम मनोहर जाधव याला रोख पाच हजार एक रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे निवेदन सुप्रसिद्ध कुस्ती निवेदक प्रा. सागर चौधरी यांनी आपल्या भारदस्त व पहाडी आवाजात केले. आमदार राहुल कुल यांनी दूरध्वनीवरून सर्व आयोजक, कुस्तीपटू व विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच माजी आमदार रमेश थोरात यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कुस्तीगिरांना मार्गदर्शन करत त्यांचा उत्साह वाढविला. यावेळी पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष माऊली ताकवणे,संपत फडके,ज्ञानेश्वर शेळके ,भरत फडके,पाटसचे माजी सरपंच संभाजी खडके,सोपान मोहिते,अरुण भागवत ,गणेश निंबाळकर,नानासो गवळी,महादेव चौधरी,पांडुरंग गवळी,दत्तात्रेय मळेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

वजन गटानुसार निकाल
बालगट (२५ किलो) : विकास खडके (पाटस). २८ किलो : स्वराज भागवत (पाटस). ३२ किलो : मोहन तांबे (पाटस). ३६ किलो : ओम शेळके (वाखारी). ४० किलो : आदिनाथ शितोळे (देऊळगाव गाडा). ४४ किलो : कृष्णा खडके (पाटस). ४८ किलो : शंभूराजे पेटकर (दहिटणे). ५१ किलो : अमित साठे (बोरीपार्धी). ६० किलो : प्रणव दिवेकर (वरवंड).
वरिष्ठ गट : गादी विभाग : ५७ किलो : ओंकार कोल्हटकर (चौफुला). ६१ किलो : गणेश कोकरे (पाटस). ६५ किलो : केतन कापरे (पिंपळगाव). ७० किलो : काशिनाथ खडके (पाटस). ७४ किलो : प्रणय टेंगले (वरवंड). ७९ किलो : निखिल गायकवाड (बोरीपार्धी). ८६ किलो : विजय कोकरे (पाटस). ९२ किलो : ऋषिकेश गायकवाड (काळेवाडी). ९७ किलो : गोकूळ खळदकर (नानगाव).
महाराष्ट्र केसरी किताब वजनगट : आदेश डुबे (राहू)
माती विभाग : ५७ किलो : वीर बोडरे (पाटस). ६१ किलो : ज्ञानेश्वर नरुटे (पाटस). ६५ किलो : ओंकार नरुटे (पाटस). ७० किलो : पोपट बरकडे (पाटस). ७९ किलो : विजय शिंगटे (गिरीम). ८६ किलो : आदित्य सांगळे (पाटस). ९२ किलो : दिव्यांक भागवत (पाटस).
महाराष्ट्र केसरी किताब वजनगट : विशाल गव्हाणे (कानगाव).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com