केसनंदच्या सरपंचपदी दत्तात्रेय हरगुडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केसनंदच्या सरपंचपदी दत्तात्रेय हरगुडे
केसनंदच्या सरपंचपदी दत्तात्रेय हरगुडे

केसनंदच्या सरपंचपदी दत्तात्रेय हरगुडे

sakal_logo
By

केसनंद, ता. १३ : केसनंद (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दत्तात्रेय मारुती हरगुडे; तर उपसरपंचपदी रेखा सुभाष बांगर यांची बिनविरोध निवड झाली.
हवेली तालुक्यातील महत्त्वपूर्ण अशा केसनंद ग्रामपंचायतीत सचिन माणिक हरगुडे यांनी ठरल्यानुसार सरपंचपदाचा; तर अक्षदा सचिन हरगुडे यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज आल्याने सरपंचपदी दत्तात्रेय हरगुडे; तर उपसरपंचपदी रेखा बांगर यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी सचिन हरगुडे, नितीन गावडे, प्रमोद हरगुडे, धनाजी हरगुडे, विशाल हरगुडे, भारत हरगुडे, रोहिणी जाधव, सुनीता झांबरे, रूपाली हरगुडे, अक्षदा हरगुडे, सुनीता हरगुडे, सुजाता गायकवाड, ज्योती हरगुडे आदी ग्रामपंचायत सदस्यही उपस्थित होते. निवड प्रक्रियेत मंडल अधिकारी अशोक शिंदे व ग्रामविकास अधिकारी बगाटे यांनी कामकाज पाहिले.
या प्रसंगी शिवसेना नेते व माजी सरपंच मिलिंदनाना हरगुडे, एस. पी. हरगुडे, तानाजी हरगुडे, संतोष हरगुडे, शंकरकाका वाबळे, तानाजी बांगर, शहाजी हरगुडे, श्रीहरी बांगर, राजेंद्र सावंत, रमेशबापू हरगुडे, वाल्मीक हरगुडे, संतोष हरगुडे, पंडित वाबळे, विकास गायकवाड, तुकाराम वाबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ॲड. अनिल हरगुडे यांनी सूत्रसंचालन केले.

मित्रांकडून फॉर्च्यूनर भेट
केसनंदच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर दत्तात्रेय हरगुडे यांना मित्रपरिवाराने चक्क आलिशान अशी फॉर्च्युनर मोटार भेट दिली. नेहमीच दुसऱ्यांसाठी झटणारे व छोट्या मोटारीत फिरणारे दत्ताआबा हे स्वत:साठी कधीच खर्च करीत नाहीत, त्यामुळे सरपंचपदी निवडीचा मुहूर्त साधत त्यांच्या मित्रपरिवाराने त्यांना ही भेट देत आर्श्चर्याचा धक्का दिला. यावेळी समर्थक मित्रपरिवाराने आणलेला व क्रेनच्या साह्याने उचलून धरलेला ‘सरपंच’ नावाचा भला मोठा हारही मिरवणुकीत लक्ष वेधून घेत होता.