सोसायटीच्या कार्यालयाचे वढू बुद्रुक येथे उद्‌घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोसायटीच्या कार्यालयाचे वढू बुद्रुक येथे उद्‌घाटन
सोसायटीच्या कार्यालयाचे वढू बुद्रुक येथे उद्‌घाटन

सोसायटीच्या कार्यालयाचे वढू बुद्रुक येथे उद्‌घाटन

sakal_logo
By

कोरेगाव भीमा, ता. १ : वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे विविध विकास सोसायटीच्या कार्यालयालयासह विकास कामांचे आमदार ॲड.अशोक पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले.
पुणे सहकारी संस्था उपनिबंधक द्विग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाचा सर्वांगिण विकास करण्याचे व त्यास भरीव निधीसह मंजुरी मिळवण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल आमदार अशोक पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व संबंधितांचे आभारही व्यक्त करण्यात आले. आमदार पवार यांनी विकास कामांच्या माध्यमातून वढू बुद्रुक येथे विकासाचा आदर्श निर्माण केल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच व विद्यमान अध्यक्ष प्रफुल्ल शिवले, सरपंच सारिका शिवले, उपसरपंच राहुल कुंभार, माजी सरपंच अंकुश शिवले, अनिल शिवले, उपाध्यक्ष काळुराम गोसावी, माजी उपसरपंच संतोष शिवले, रमाकांत शिवले, लालाशेठ तांबे, संजय शिवले, भाऊसाहेब शिवले, राजाभाऊ आहेर, ग्रामपंचायत सदस्य अंजली शिवले, रेखा शिवले, माऊली भंडारे, कृष्णा आरगडे, संगिता सावंत, संचालक आंनदा शिवले, रंगनाथ भंडारे, अंकुश भंडारे, अर्चना शिवले, रत्नमाला आरगडे, कांताराम आरगडे आदींसह अनेक मान्यवर व शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.
…………
03481