वाघोलीत तरुणाकडून पिस्तूल, काडतुसे जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाघोलीत तरुणाकडून
पिस्तूल, काडतुसे जप्त
वाघोलीत तरुणाकडून पिस्तूल, काडतुसे जप्त

वाघोलीत तरुणाकडून पिस्तूल, काडतुसे जप्त

sakal_logo
By

केसनंद, ता. ३ : वाघोली (ता. हवेली) येथे बकोरी रस्ता परिसरातून एका तरुणाकडून ३४ हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. विशाल जगनाथ पंदी (वय २१, रा. बकोरी रस्ता, वाघोली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बकोरी रस्त्यावरील न्याती एलान सोसायटीनजिकच्या लेबर कॅम्पजवळ सराईत तरुण विशाल पंदी हा पिस्तुलासह उभा असल्याची माहिती लोणीकंद पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली. त्यानुसार त्याला तातडीने जेरबंद करून त्यांची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. त्यानुसार गुन्हा दाखल करून लोणीकंद पोलिसांनी या तरुणास अटक केली.