Wed, March 22, 2023

वढू-तुळापूरातून ज्योत मिरवणुका
वढू-तुळापूरातून ज्योत मिरवणुका
Published on : 10 March 2023, 4:15 am
केसनंद, ता. १० : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र वढू-तुळापुरातसह नगर रस्ताही ज्योत मिरवणुका व शिवशंभूराजेंसह जयजयकाराने दुमदुमून गेला होता. शिवजयंतीनिमित्त सकाळपासूनच वढू-तुळापुरात छत्रपती संभाजी महाराज समाधिस्थळी विविध ठिकाणाहून शक्तीज्योतीचे आगमन तसेच प्रस्थान झाले. ढोल-ताशा पथकांसह ज्योत मिरवणुका व शिवशंभूराजेंच्या जयजयकाराने वढू-तुळापूर व नगर रस्ता परिसर दुमदुमत होता. दुचाकी व चार चाकी वाहनांना भगवा झेंडे बांधून भगवे फेट्यातील शिवशंभूभक्तांच्या घोषणांनी वढू-तुळापूर परिसर अक्षरश: दणाणून गेला. वढू-तुळापूर ग्रामस्थांकडून शंभुभक्तांचे स्वागतही करण्यात आले.