शिरूर-हवेलीचे पदाधिकारी 
मांडतात होर्डिंगबाबत व्यथा

शिरूर-हवेलीचे पदाधिकारी मांडतात होर्डिंगबाबत व्यथा

केसनंद, ता. १४ : मुंबईत घाटकोपर येथे झालेल्या होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण हद्दीतील अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुणे-नगर रस्त्यावर शिरूर-हवेलीत कोरेगाव भीमा, पेरणे, लोणीकंद, केसनंदसह ग्रामीण परिसरात ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या अनेक होर्डिंगसाठी स्थानिक ग्रामपंचायतीची परवानगी घेतली गेली नसल्याची माहिती पुढे आली आहे. यातील अनेक होर्डिंग ही हमरस्त्यालगत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हद्दीत अथवा खासगी जागेत आहेत.

केसनंद ग्रामपंचायत हद्दीमध्ये १९ मोठे होर्डिंग असून या सर्वांना ग्रामपंचायतीने परवानगी घेण्याबाबत अथवा घेतली असल्यास कळवण्याबाबत नोटिसा दिल्या होत्या. मात्र त्यांच्याकडून परवानगी व नोंदीबाबत प्रतिसाद आला नसल्याचे ग्रामविकास अधिकारी पी.. व्ही. ढवळे यांनी सांगितले.

तर लोणीकंद ग्रामपंचायत हद्दीमध्ये २२ लहान मोठी होर्डिंग असून यातील एकानेच ग्रामपंचायतीची परवानगी घेतलेली होती, मात्र तिचीही मुदत संपली असल्याची माहिती लोणीकंदचे उपसरपंच राहुल शिंदे यांनी दिली.

तसेच पेरणे हद्दीत सुमारे १० ते ११ लहान मोठी होर्डिंग असून यापैकी कोणीही ग्रामपंचायतीची परवानगी घेतलेली नाही. मात्र एक जानेवारीच्या विजयस्तंभ अभिवादनानिमित्त या सर्व होर्डिंग धारकांना नोटीस दिल्याचे पेरणेचे ग्रामविकास अधिकारी के. एल. थोरात यांनी सांगितले.

पदाधिकाऱ्यांचे म्हणणे
ग्रामीण हद्दीत नगर हमरस्ता वगळता इतर आतील गावाला जोडणाऱ्या मोठ्या रस्त्यांवरही मोठ्या संख्येने होर्डिंग आहेत. या होर्डिंग बाबतही स्थानिक ग्रामपंचायतीकडून परवानगी घेतल्याची शक्यता फारच कमी आहे. यापूर्वी वाघोलीसह पुण्यात व नाशिक रस्त्यावर होर्डिंग कोसळल्याच्या घटना घडून ल्या मोठी हानी झाली आहे. सुदैवाने ग्रामीण हद्दीत मात्र अद्यापपर्यंत होर्डिंग बाबत मोठी दुर्घटना घडलेली नसली तरीही यापुढच्या काळात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वेळीच स्ट्रक्चरल ऑडिटसह संबंधित यंत्रणांकडून योग्य ती परवानगी घेण्यासह आवश्यक काळजी घेणे आवश्यक असल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या हद्दीत लहान मोठी ३० पेक्षाही अधिक होर्डिंग
असून यापैकी काही धोकादायक होर्डिंगबाबत संबंधित पीएमआरडीए प्रशासनाला ग्रामपंचायतीने कळविले होते. मात्र त्याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. अशा परिस्थितीत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील या होर्डिंग बाबत दुर्दैवाने काही दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची?
- विक्रम गव्हाणे, सरपंच, कोरेगाव भीमा


बेकायदेशीर होर्डिंग
केसनंद - १९
लोणीकंद -३२
पेरणे १०-१५
…….

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com