शुभकार्यात निवेदकांना वाढतेय मागणी
कोरेगाव भीमा, ता. ११ : सध्या लग्नसमारंभ, साखरपुडा, नामकरण, गृहप्रवेश यांसारख्या कार्यक्रमांच्या योग्य नियोजनासोबतच प्रभावी सूत्रसंचालनालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तर दिवसेंदिवस निवेदकांची मागणी वाढल्याने तरुणाईही या विशेष क्षेत्राकडे ‘करीअर’ म्हणून पाहू लागले आहेत.
सूत्रसंचालक कार्यक्रमात उपस्थित पदाधिकाऱ्यांचा पदासह नामोल्लेखाने स्वागत, योग्य शब्द मांडणी, कार्यक्रमाशी सुसंगत संदर्भ, विनोद आणि अतिथींचा योग्य सत्कार यामधून कार्यक्रम अधिक प्रभावी बनतो. त्यामुळेच कार्यक्रमांमध्ये सुसंस्कृत, अलंकारिक भाषेत आणि प्रसंगी वेगवेगळ्या भाषांमध्येही संवाद साधू शकणाऱ्या निवेदकांना प्राधान्य दिले जाते.
कार्यक्रमात प्रभावी सूत्रसंचालन तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून या निवेदकांना प्रसिद्धी मिळत आहे. अशा निवेदकांची बोलण्याची शैली, आवाजातील आकर्षकता, संस्कारांची मांडणी हे सर्व घटक ग्राह्य धरुन त्यांच्याशी संपर्क साधला जातो. तसेच कार्यक्रमाचे स्वरूप आणि लोकप्रियतेनुसार पाच ते १५ हजार रुपयांपर्यंत मानधनही दिले जाते.
त्यामुळे विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, धार्मिक कार्यक्रमाचे निरुपण, क्रिडा समालोचन, बैलगाडा शर्यतीतील विशेष अनाउन्सर अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमात निवेदन करणाऱ्यांची पूर्वी बोटावर मोजता येणारी संख्या आता काही तालुक्यात शेकड्यात दिसू लागली आहे. शुभकार्य केवळ एक विधी न राहता एक सुंदर अनुभव व्हावा, यासाठी निवेदकाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते आणि त्यांच्या अस्तित्वाची गरजही अधोरेखित होत आहे.
स्पर्धेचा थरार वाढविणारे बैलगाडा निवेदक
बैलगाडा शर्यतीतील अनाउन्सर अत्यंत उत्साही आणि प्रभावपूर्ण आवाजात प्रेक्षकांना शर्यतीची माहिती, बैलांची वैशिष्ट्ये, बैलगाडा मालकांची ओळख आणि शर्यत नियमांच्या सादरीकरणामुळे स्पर्धेचा थरार आणि जोश निर्माण होतो. तर प्रतिस्पर्धी, वेळेचे अपडेट्स आणि निकाल जाहीर करण्याचे मोठे काम निवेदन मोठ्या कौशल्याने करीत असतो. त्यांच्या शब्दामुळे प्रेक्षकांमध्ये उत्साह आणि स्पर्धेचा थरार वाढतो. मात्र या क्षेत्रात स्थानिक माहितीसह ग्रामीण संस्कृतीची जाण व चांगले संवादकौशल्य आवश्यक असते.
सध्या आम्हा निवेदकांना आयोजकांच्या अपेक्षेनुसार पूर्ण तयारीने कार्यक्रमाला जावे लागते. केवळ सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन करताना मान्यवरांची नावे, पदे तसेच अधिक संदर्भासाठी जनसंपर्क, समाजमाध्यमे, वर्तमानपत्रांसह अवांतर वाचन, मननही करतो. तसेच चांगल्या आवाजासाठी रोज योग, प्राणायामही करतो. त्यामुळे निवेदनाचा दर्जा, प्रतिसादही सतत वाढत आहे.
पोपटराव इंगवले, निवेदक, जातेगाव.
जनसंपर्काची, वाचनाची, ऐकण्याची आवड असल्याने भेटलेली माणसे, ऐकलेली माहिती कायम लक्षात राहते, त्यामुळे मान्यवरांची नावे पदासह पट्कन आठवतात. आवाज चांगला राखण्यासाठी खाण्यापिण्याची पथ्ये पाळतो, तर गेली १५ वर्षं विविध स्पर्धाचेही निवेदन, सूत्रसंचालनाचा अनुभव असून मानधनही चांगले मिळते.
अतुल बनकर, निवेदक, वाघोली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.