बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी महिलेला अर्थसाह्य
केसनंद, ता.१८ : बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या अष्टापूर (ता.हवेली) येथील महिलेला शिरूर-हवेलीचे आमदार माऊली कटके यांच्या पाठपुराव्यानंतर वन विभागाकडून पाच लाखांची मदत देण्यात आली.
शिरूर-हवेलीतील अनेक गावांमध्ये सध्या पाळीव प्राण्यांबरोबरच मानवी हल्लेही वाढल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यातच ९ डिसेंबरला सकाळी अष्टापूर (ता. हवेली) येथे अंजना वाल्मीक कोतवाल या महिलेवर बिबट्याचा हल्ला झाल्याने आमदार कटके यांनी वनविभाग प्रशासनाला धारेवर धरले होते. बिबट्यांच्या मानवी वस्तीत वाढता वावर तसेच शिरूर-हवेलीतील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आमदार कटके यांनी सभागृहात लक्षवेधी सूचनेद्वारे आवाज उठवत ठोस उपाययोजनेची मागणी केली होती. तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनाही फोन करून जखमी महिलेला उपचार व मदत तसेच या परिसरातील बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. यामध्ये आवश्यक तेथे ताबडतोब पिंजरे वाढवून ट्रॅकिंग कॅमेरे तसेच सर्चिंग ड्रोनद्वारे बिबट्यांचा शोध घेण्याबाबतही सूचना दिलेल्या आहेत. दरम्यान, आमदार माऊली कटके यांनी सभागृहात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर शासनाकडूनही कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर वनविभाग प्रशासनाकडून जखमी महिलेला उपचार व मदत करण्यासाठी वेगवान कार्यवाही करण्यात आली.
रुग्णालयात जाऊन केली मदत
शासननिर्णयाप्रमाणे वन्यप्राण्याच्या हल्यात मनुष्य गंभीर जखमी झाल्यास पाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्याबाबत असलेल्या तरतुदीच्या अनुषंगाने अंजना वाल्मिक कोतवाल (वय ५०, रा. आष्टापूर, ता. हवेली) यांना पाच लाख रुपयांच्या अर्थसहाय्याचा धनादेश वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांच्या माध्यमातून नुकताच आमदार माऊली कटके यांच्या हस्ते अंजना कोतवाल यांना रुग्णालयात जाऊन देण्यात आला. याप्रसंगी यशवंत साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप तसेच अन्य पदाधिकारी व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
5252
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

