मतदारांच्या ओळख 
तपासणीबाबत सूचना

मतदारांच्या ओळख तपासणीबाबत सूचना

Published on

केसनंद, ता. ५ : हवेली तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी मतदारांची ओळख पटविण्याबाबत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्पष्ट निर्देश निवडणूक प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत. या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश हवेली निवडणूक प्रशासनाकडून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
हवेली तालुक्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मतदान प्रक्रियेची तयारी सुरू असून, मतदार ओळख तपासणीबाबत कोणतीही गफलत होऊ नये, यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या असून या संदर्भातील आदेश अधिकृतरीत्या जारी करण्यात आले आहेत.
हवेली तालुक्यातील सर्व मतदान केंद्राध्यक्ष, क्षेत्रीय अधिकारी, मतदान कर्मचारी तसेच माध्यम अधिकारी योगेश हांडगे पाटील यांच्या समन्वयाने या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयातील माध्यम कक्षामार्फत जनतेपर्यंत पोहोचवली जात आहे. मतदानाच्या दिवशी आवश्यक ओळखपत्रे सोबत ठेवून शांततेत, निर्भय व सुव्यवस्थित वातावरणात मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे व लोकशाहीच्या या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने मतदारांना आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com