
महाराजा होळकर यांचा उद्या राज्याभिषेक सोहळा
केडगाव, ता. ४ : इंग्रजांविरुद्ध लढा उभारणारे महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांचा राज्याभिषेक दिन सोहळा शुक्रवारी (ता. ६) किल्ले वाफगाव (ता. खेड) येथे साजरा होणार आहे. यावेळी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन होळकर घराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर यांनी केले आहे.
या सोहळ्याची दौंड तालुका आढावा बैठक टेळेवाडी (ता.दौंड) येथे आयोजित केली होती. त्यावेळी भूषणसिंह बोलत होते. ते म्हणाले, सोहळ्यात गजी नृत्य, ढोल वादन, मर्दानी खेळ, शस्त्रात्र तसेच पुस्तक प्रदर्शन, व्याख्यान आयोजित केले आहे. या सोहळ्यास देशातून अनेक ऐतिहासिक घराण्यांचे वंशज, सरदार, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. यावेळी रामकृष्ण बिडगर, बाळासाहेब कारंडे, अॅड. दौलत ठोंबरे, शिवाजी टेंगले, संजय टेळे, साहेबराव टेंगले, सोनबा टेळे, तात्यासाहेब टेळे उपस्थित होते.