प्रांजली पिसेची बीसीसीआयकडून निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रांजली पिसेची बीसीसीआयकडून निवड
प्रांजली पिसेची बीसीसीआयकडून निवड

प्रांजली पिसेची बीसीसीआयकडून निवड

sakal_logo
By

केडगाव, ता. ५ ः केडगाव (ता.दौंड) येथील प्रांजली सोमा पिसे हिची १५ वर्षाखालील क्रिकेट संघात बीसीसीआयने निवड केली. महाराष्ट्र संघासाठी तीची निवड झाली आहे. बीसीसीआयकडून निवड झालेली प्रांजली ही दौंड तालुक्यातील पहिलीच खेळाडू ठरली आहे.
निवडीनंतर एक दिवसीय साखळी क्रिकेट स्पर्धा रांची (झारखंड) व जयपूर (राजस्थान) येथे होणार आहेत. रणजी संघाचे माजी कर्णधार व केडन्स क्रिकेट अकादमीचे प्रमुख प्रशिक्षक निखिल पराडकर हे गेल्या तीन वर्षापासून प्रांजलीला प्रशिक्षण देत आहेत.
डी.वाय. पाटील महाविद्यालयात झालेल्या १५ वर्षाखालील स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रांजली सामनावीर ठरली. बी.व्ही. राव स्मृती करंडक स्पर्धेत युथ स्पोटर्स क्लबला विजय मिळवून दिल्याने तीला सामनावीर म्हणून गौरविले. मास्टर्स क्रिकेट स्पर्धेत तीने ३४ धावा देत ५ फलंदाज बाद केले. या कामगिरीमुळे ती सामनावीर ठरली.
प्रांजली बोरीपार्धी (ता.दौंड) येथील शिवाजीराव जेधे विद्यालयात नववीच्या वर्गात शिकत आहे. ती गेल्या तीन वर्षापासून सरावासाठी केडगाव ते पुणे रोज प्रवास करत आहे. तीच्या निवडीबद्दल परिसरात कौतुक होत आहे.
प्रांजली म्हणाली, ‘‘बीसीसीआयकडून महाराष्ट्र संघासाठी माझी निवड होईल, हे अपेक्षित होते. भारतासाठी खेळायचे आणि विजेतेपद मिळवायचे हे माझे स्वप्न आहे. गेली तीन वर्ष मी रोज सकाळ, दुपार, सायंकाळी एकूण आठ तास सराव करते. माझे वडील सोमा पिसे, आई नीलम व माझे प्रशिक्षक निखिल पराडकर यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.’’