दौंड खरेदी विक्री संघात दोन उमेदवारांना पाठिंबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंड खरेदी विक्री संघात 
दोन उमेदवारांना पाठिंबा
दौंड खरेदी विक्री संघात दोन उमेदवारांना पाठिंबा

दौंड खरेदी विक्री संघात दोन उमेदवारांना पाठिंबा

sakal_logo
By

केडगाव, ता. ५ : दौंड तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वरवंड गटातील अधिकृत उमेदवार संजय धायगुडे यांना उमेदवार लक्ष्मण दिवेकर (राष्ट्रवादी) यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या गटात भाजपचे सचिन सातपुते व धायगुडे यांच्यात लढत होईल.
तसेच, पिंपळगाव गटात राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार मोहन टुले यांना उमेदवार नारायण जगताप (राष्ट्रवादी) यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे टुले यांचा विजय निश्चित झाला आहे.
जगताप व दिवेकर यांनी पाठिंब्याची पत्रके काढली आहेत. पाटस गटात रंजना भागवत (भाजप) व शिवाजी ढमाले (राष्ट्रवादी) यांच्यात लढत होत आहे. तीन गटातील एकूण ३९ मतदार आठ जानेवारीला मतदान करतील. त्याच दिवशी केडगाव येथे मतमोजणी होईल. संघाच्या १७ पैकी १४ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. तीन जागांसाठी निवडणूक होत आहे.