
देऊळगाव गाडा येथे माजी विद्यार्थी मेळावा
केडगाव, ता. ९ : देऊळगाव गाडा (ता. दौंड) येथील श्री सद्गुरू विद्यालयात २१ वर्षांनी दहावीचा वर्ग पुन्हा भरला.
या वेळी माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे पाद्यपूजा करत फुलांचा वर्षाव केला. या अनोख्या स्वागताने शिक्षक भारावून गेले. कार्यक्रमाची सुरुवात नवजीवन शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेव बारवकर व डी. डी. बारवकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. या वेळी शिक्षकांचा स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीला माजी सैनिक व शेतकरी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थांनी शाळेला वीस हजार रुपये किमतीचे प्रयोगशाळा साहित्य भेट दिले.
याप्रसंगी शिक्षक कैलास कुसेकर, सुरेश चौधरी, आनंदा चौधरी, संजय गाडेकर, महादेव कुदळे, दीपक बारवकर, जयश्री कुदळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य वाल्मीक बारवकर यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी विद्यार्थी माधुरी पवार, रूपाली शितोळे, नूतन जाचक, साधना चौधरी, मीनाक्षी बारवकर, शोभा बारवकर, मनीषा बनकर, वैशाली हरिहर, जयश्री कौले, डॉ. अभिषेक बारवकर, गणेश डेंबळकर, संदीप जाधव, संतोष बारवकर, अतुल चव्हाण, मारुती मोरे आदी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नूतन जाचक व रूपाली शितोळे यांनी केले. आभार साधना चौधरी यांनी मानले.