दौंड खरेदी-विक्री संघात भाजपचा शिरकाव तीनपैकी एका जागेवर विजय; १४ जागा यापूर्वीच बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंड खरेदी-विक्री संघात भाजपचा शिरकाव
तीनपैकी एका जागेवर विजय; १४ जागा यापूर्वीच बिनविरोध
दौंड खरेदी-विक्री संघात भाजपचा शिरकाव तीनपैकी एका जागेवर विजय; १४ जागा यापूर्वीच बिनविरोध

दौंड खरेदी-विक्री संघात भाजपचा शिरकाव तीनपैकी एका जागेवर विजय; १४ जागा यापूर्वीच बिनविरोध

sakal_logo
By

केडगाव, ता. ८ : दौंड तालुका खरेदी-विक्री संघाच्या तीन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसला तर एक जागा भाजपला मिळाली आहे. विजयानंतर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

वरवंड गटातून भाजपच्या सचिन सातपुते यांनी राष्ट्रवादीच्या संजय धायगुडे यांचा तीन विरुद्ध पाच मतांनी पराभव केला. पाटस गटातून राष्ट्रवादीच्या शिवाजी ढमाले यांनी भाजपच्या रंजना भागवत यांचा सहा विरुद्ध १२ मतांनी पराभव केला. तर पिंपळगाव गटात राष्ट्रवादीचेच दोन उमेदवार रिंगणात होते. राष्ट्रवादीचे मोहन टुले यांना राष्ट्रवादीच्याच नारायण जगताप यांनी पाठिंबा दिला होता. या गटात १३ पैकी १२ मतदान झाले. जगताप यांनी पाठिंबा देऊनही त्यांना पाच मते मिळाल्याने टुले यांचा अवघ्या दोन मतांनी विजय झाला.

खरेदी-विक्री संघावर राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश थोरात यांचे वर्चस्व आहे. भाजपने यापूर्वी कधीही संघाच्या निवडणुकीत भाग घेतला नव्हता. संघाच्या संचालक मंडळाच्या १७ जागांसाठी निवडणूक लागली होती. यापैकी १४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. पाटस, वरवंड व पिंपळगाव गटात निवडणूक लागली होती. तीन जागांसाठी केडगाव येथे मतदान झाले. मतदानानंतर लगेचच मतमोजणी घेण्यात आली.

निकालानंतर मतमोजणी केंद्रात माजी आमदार थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, नितीन दोरगे, पाराजी हंडाळ, दिलीप हंडाळ, सागर फडके, झुंबर गायकवाड यांनी राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांचे तर भाजपच्या नामदेव बारवकर, आनंद थोरात, संजय दिवेकर, गोरख दिवेकर, तुकाराम ताकवणे, उमेश देवकर यांनी सचिन सातपुते यांचे अभिनंदन केले.