Sat, March 25, 2023

कांदा उत्पादकांचे
प्रश्न सोडवा : कुल
कांदा उत्पादकांचे प्रश्न सोडवा : कुल
Published on : 28 February 2023, 9:02 am
केडगाव, ता. २८ : कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तपणे प्रयत्न करावेत, अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत केली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभेत चर्चा सुरू असताना ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘राज्यात उसाची व शेतीची चांगली परिस्थिती असताना कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केलेली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला असून, याबाबत राज्य व केंद्र सरकारने एकत्रितपणे निर्णय घेतल्यास तो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासादायक ठरणार आहे. याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल.’’