दौंड बाजार समितीत चांगला बदल घडवू : कुल

दौंड बाजार समितीत चांगला बदल घडवू : कुल

केडगाव, ता. १ : बाजार समितीमध्ये काय त्रुटी आहेत. शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना काय सुविधा देता येतील, काय योजना राबविता येतील याबाबत माहिती मागविण्यात आली आहे. विविध योजनांच्या माध्यमातून आगामी काळात निश्चित चांगला बदल घडवू, अशी ग्वाही आमदार राहुल कुल यांनी दिली.

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या कोणत्या योजना आहेत, याची माहिती मागविण्यात आली आहे, असे कुल यांनी दौंड बाजार समितीच्या परिसराची पाहणी करताना सांगितले.

दौंड बाजार समितीत आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच भाजपचा झेंडा फडकला आहे. प्रचारादरम्यान कुल यांनी बाजार समितीत सत्ता द्या तेथे परिवर्तन घडवून आणू, अशी आश्वासने दिली होती. सत्ता मिळाल्याने परिवर्तनाचे मोठे आव्हान कुल यांच्यापुढे आहे.

निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ जागा तर भाजपला नऊ जागा दिल्या. सभापती, उपसभापती निवड होण्याअगोदरच राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित संचालक संपतराव निंबाळकर यांचे निधन झाले. त्यामुळे भाजपचे नऊ तर राष्ट्रवादीचे आठ संचालक असे बलाबल राहिले. त्यामुळे दोन्ही पदांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले.
सध्या राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार आहे. कुल यांनी विकासकामे करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे कुल काय परिवर्तन करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान बाजार समितीचे सभापती गणेश जगदाळे व त्यांच्या सहकार्यांनी नुकतीच बाजार समितीच्या केडगाव उपबाजाराला भेट देली. यावेळी संचालक मंडळाने व्यापारी व शेतकऱ्यांशी चर्चा करत माहिती घेतली. बाजार समितीची लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहिती ज्येष्ठ संचालक अशोक फरगडे यांनी दिली. यावेळी संचालक अशोक फरगडे, संतोष आखाडे, बापूसाहेब झगडे, अतुल ताकवणे, राहुल चाबुकस्वार, भरत खराडे व कालिदास रूपनवर, व्यापारी किशोर भोसले उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com