कुल पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सखाराम सुपनवर

कुल पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सखाराम सुपनवर

Published on

केडगाव, ता. ३ : चौफुला (ता. दौंड) येथील राहुलदादा कुल ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सखाराम रंगनाथ सुपनवर यांची, तर उपाध्यक्षपदी सुजाता तुकाराम गडधे यांची बिनविरोध निवड झाली.
पतसंस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत सुपनवर आणि गडधे यांची निवड करण्यात आली. दोन्ही निवडीसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने या निवडी बिनविरोध झाल्या. संचालकपदी मल्हारराव गडधे, अंकुश शेंडगे, ज्ञानदेव काळे, दीपक जगताप, रामदास बनकर, अनिल कोळपे, तुकाराम शेंडगे, ऋषिकेश धायगुडे आणि शांताबाई भंडारी यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. एम. गव्हाणे यांनी काम पाहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.