करआकारणी थकबाकीसह दोन कोटी ११ लाख रुपये

करआकारणी थकबाकीसह दोन कोटी ११ लाख रुपये

केडगाव, ता. ११ : केडगाव (ता. दौंड) ग्रामपंचायतीची करआकारणी थकबाकीसह दोन कोटी ११ लाख रुपये असून गेल्या आर्थिक वर्षात अनेक प्रयत्न करूनही केवळ ३८ टक्के करवसुली झाल्याचे ग्रामविकास अधिकारी डी. एल.काळे यांनी सांगितले.
केडगाव ग्रामपंचायतीची सोमवारी (ता. १०) सरपंच पौर्णिमा बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. यामध्ये काळे यांनी ही माहिती दिली. केडगावची लोकसंख्या अंदाजे ३० हजार इतकी असून दौंड तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये तीचा समावेश आहे. सहा महसुली गावांचे मिळून एक केडगाव आहे.
केडगाव ग्रामपंचायतींमध्ये १९ कामगार असून, त्यांचा महिन्याचा पगार सव्वादोन लाख रुपये इतका आहे. घरपट्टीची वसुली अत्यल्प असल्याने कामगारांचे पगार कसे करायचे? हा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनपुढे आहे. गेल्या मार्चअखेरपर्यंत ३८ टक्के वसुली झाली असून गेली तीन ते चार वर्षापासून थकबाकी वाढतच असल्याचे काळे यांनी सांगितले. चालू वर्षाची करआकारणी ६८ लाख असून, घरपट्टी भरण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. केडगावमध्ये ३५ हौसिंग सोसायट्या असून यापैकी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या सोसायटीची नोंद ग्रामपंचायतमध्ये आहे. मात्र ग्रामपंचायत सर्वच सोसायट्यांना सुविधा पुरवत आहे. पीएमआरडीए याकडे कधी लक्ष देणार हा कळीचा मुद्दा आहे. ज्या ग्रामस्थांची किंवा सोसायटीची थकबाकी आहे त्यांचा पाणी पुरवठा ग्रामपंचायतीने बंद करावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली. ग्रामपंचायत उत्पन्न वाढीसाठी गावातील इमारतींचे चार महिन्यात फेरसर्वेक्षण पूर्ण करा, अशी सूचना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल कापरे यांनी केली आहे.

दरम्यान, ग्रामपंचायतीच्या २०१८ ते २०२३ या पंचवार्षिकमध्ये प्रशासनाने कामे अर्धवट असताना बिले अदा केली आहेत. त्या वादग्रस्त बिलांशी विद्यमान सरपंच पौर्णिमा बारवकर यांचा संबंध नसल्याचे ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप यांनी सांगितले.

सदनिकाधारकांच्या डोक्यावर टांगती तलवार
केडगावमधील सुमारे ३० गृहनिर्माण सोसायटीच्या विकसकाने ग्राहकांना सदनिकेचा दाबा देताना तो करारनाम्याने दिला आहे. नगरविकासचे नियम न पाळल्याने या सोयासट्या अनधिकृत आहेत. त्यामुळे ते ग्राहकांना खरेदीखत करून देऊ शकत नाही. परिणामी असंख्य सदनिका धारकांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. या सोसायट्यांपासून ग्रामपंचायतीला काहीही उत्पन्न नाही. असा मुद्दा ग्रामसभेत उपस्थित झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com