ॲप ऑफट्रॅक, रेल्वे ऑनट्रॅक
केडगाव, ता. १० : सध्या रेल्वेशी संबंधित लोकप्रिय ‘व्हेअर इज माय ट्रेन’ या अॅपवर अनेकजण अवलंबून आहेत. अॅप बहुतांश वेळा रेल्वेची वेळ बरोबर दाखवते; मात्र कधीतरी अॅप चुकू शकते. याचा अनुभव केडगावातून (ता. दौंड) प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी बुधवारी (ता. १०) घेतला. अॅपने रेल्वे उशिरा असल्याचे दाखविले; परंतु रेल्वे नियमित वेळेत स्टेशनवर आली. अॅपवर विश्वास ठेवणाऱ्या सुमारे १२५ प्रवाशांची रेल्वे बुधवारी चुकली.
आजचा काळ स्मार्टफोन, इंटरनेट आणि विविध मोबाइल अॅप्सवर प्रचंड अवलंबलेला आहे. रेल्वेच्या वेळापत्रकापासून तिकीट बुकिंगपर्यंत सर्वकाही हातातील मोबाइलवर उपलब्ध आहे. पण या तंत्रज्ञानावर अतिअवलंबून राहिल्याने कधीकधी फसगत कशी होऊ शकते याचा अनुभव केडगावच्या प्रवाशांनी घेतला. ट्रेन चुकल्याने पुढील प्रवास कोलमडला आणि पर्यायी व्यवस्था करताना वेळ, पैसा आणि मनस्ताप करून घ्यावा लागला. बारामती ते पुणे डेमू रेल्वेची केडगाव येथील वेळ सकाळी ८.४९ वाजताची आहे. ही रेल्वे बुधवारी वेळेवर धावली; मात्र त्याच वेळी ही रेल्वे अॅपवर दौंड येथे थांबल्याचे दिसत होते. यामुळे स्टेशनवर उशिरा आलेल्या सुमारे १२५ प्रवाशांची रेल्वे चुकली. या रेल्वेनंतर पुण्याला जाण्यासाठी साडेपाच वाजता रेल्वे असते. त्यामुळे प्रवाशांना चौफुला येथे येऊन बसने पुणे गाठावे लागले. मागील आठवड्यात मुंबई-हैद्राबाद एक्स्प्रेस रेल्वे उरुळीकांचनमध्ये होती; मात्र अॅपवर ती लोणावळ्यात दिसत असल्याचे प्रवासी अविनाश कांबळे यांनी सांगितले.
इंटरनेट आधारित अॅप्सची माहिती अनेकदा नेटवर्क, जीपीएस कव्हरेज, तांत्रिक विलंब किंवा डेटा अपडेट न झाल्यामुळे चुकीची दिसू शकते. रेल्वेची अधिकृत घोषणा, स्टेशनवरील इलेक्ट्रॉनिक बोर्ड किंवा १३९ हेल्पलाइन यांनाही महत्त्व द्यायला पाहिजे. प्रवाशांनी वेळेची खातरजमा करण्यासाठी एकाच अॅपवर अवलंबून न राहता NTES किंवा रेलवन या सरकारी अॅपचा वापर करावा.
- मयूर सहदेवडा, संगणक तज्ज्ञ, केडगाव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

