
निमगाव परिसरातील वीजपुरवठा परीक्षा काळात सुरळीत ठेवा
निमगाव केतकी, ता.१ : निमगाव केतकी (ता.इंदापूर) परिसरातील गावांमध्ये मागील काही दिवसापासून वीजपुरवठा खंडित होत आहे. सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. या काळात काळात तो सुरळीत ठेवावा, अशी मागणी सहायक अभियंता विद्युत वितरण कंपनी निमगाव केतकी यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, की आह काही दिवसांपासून निमगाव परिसरात वीज पुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. उद्या गुरुवारपासून दहावीच्या मुलांची परीक्षा सुरू होत आहे. सध्या परीक्षांच्या काळात रात्री अचानकपणे वारंवार वीज खंडित होत आहे, वीज गेली तर तासंतास येत नाही. यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वीज सुरळीत राहिली तर विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राजू भोंग, राम अभंग, मंगेश भोंग, अंबादास जगताप, शशी भोंग, ओंकार शेंडे, समाधान भोंग, अनिल भोंग, कांतिलाल खराडे उपस्थित होते.
01619