प्रक्रिया उद्योगासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ

प्रक्रिया उद्योगासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ

Published on

निमगाव केतकी, ता.५ : ‘‘पेरूसह इतर फळ पिकांना अधिक बाजारभाव मिळावा म्हणून विक्री व्यवस्थापन व प्रक्रिया उद्योगासाठी अधिक चालना देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिली.

कचरवाडी (ता. इंदापूर) येथे अभ्यास दौऱ्यानिमित्त सोमवारी (ता.४) प्रयोगशील शेतकरी माणिक बरळ व महादेव बरळ या बंधूच्या शेतावर येऊन गोगावले यांनी नवीन तंत्रज्ञानद्वारे केलेल्या प्रयोगाची व प्रगतीची माहिती घेतली.
गोगावले यांनी बरळ बंधूंनी कष्ट व अभ्यासातून १८ गुंठे ते अठरा एकर क्षेत्रापर्यंत जलवाहिनी, शेततळी, ठिबकद्वारे अभ्यासातून डाळिंब, पेरू, फॅशन फ्रूट, जांभूळ या पिकातून केलेल्या प्रगतीचे भरभरून कौतुक केले.
यावेळी शेतकरी कैलास पाटील, कृष्णा बनकर, चंद्रकांत हेगडे, सुनील बनसोडे, बबन खराडे, स्वप्नील भोंग यांनी सांगितले की, इंदापूर तालुक्यामध्ये तेल्या रोगामुळे डाळिंबाचे क्षेत्र कमी झाले आहे. सध्या पेरूचे क्षेत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत बाजारभाव मिळत नसल्याने पेरूच्या निर्यातीला मोठ्या प्रमाणात वाव दिला जावा व या फळावर प्रक्रिया उद्योगासाठी सरकारने जास्त प्रयत्न करणे गरजेचे आहे. या पिकासाठी लागणाऱ्या फोम व कॅरीबॅगला देखील अनुदान दरवर्षी मिळावे तसेच पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त लागवड असलेल्या गुजरात रेड, पिंक, व्हीएनआर या पेरूच्या वाणांच्या लागवडीला देखील इतर वाणांप्रमाणे लागवडीसाठी अनुदान मिळावे. मागील दोन-तीन वर्षांपासून शेतकऱ्यांची ठिबक, शेततळी यासह अन्य रखडलेले अनुदान देखील तातडीने काढण्यात यावे.
यावेळी इंदापूरचे गटविकास अधिकारी सचिन खुडे, तालुका कृषी अधिकारी किरण पिसाळ, मंडळ कृषी अधिकारी संजय कदम, उपकृषी अधिकारी बाळासाहेब यादव, सहाय्यक कृषी अधिकारी वर्षा बोराटे, ललिता घाडगे, निमगाव केतकीचे ग्रामपंचायत अधिकारी लक्ष्मीकांत जगताप, कचरवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी भारत मारकड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. संतोष गदादे यांनी सूत्रसंचालन केले.
02823

Marathi News Esakal
www.esakal.com