झांज, टिपऱ्यांची शेळगावात प्रात्यक्षिके
निमगाव केतकी, ता. २८ : शेळगाव (ता. इंदापूर) येथील श्री संत मुक्ताबाई विद्यालयात पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यात सहभागी विद्यार्थ्यांनी ढोल, लेझीम, झांज व टिपऱ्यांची प्रात्यक्षिके सादर केली.
मुख्याध्यापक संजू गावडे व स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य ॲड. लक्ष्मणराव शिंगाडे, स्कूल कमिटीचे सदस्य रामदास शिंगाडे, भागवत भाऊ भुजबळ यांच्यासह सर्व स्कूल कमिटी सदस्यांच्या हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक संजू गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक ईश्वर आवाळे, आजिनाथ मारकड, वैभव यादव, संगीता गुरव, नितीन मदने, विजय पवार, अंजली खताळ, नितीन शिंदे व सर्व शिक्षकांच्या व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. सूत्रसंचालन भारत पाटील यांनी तर गुंड श्रीराम यांनी आभार मानले.