बाजाभावातील घसरणीमुळे उत्पादक हतबल

बाजाभावातील घसरणीमुळे उत्पादक हतबल

Published on

निमगाव केतकी, ता.२९ : केळीच्या बाजारभावात या आठवड्यात प्रचंड मोठी घसरण झाली आहे. प्रतिकिलोला अवघा तीन ते पाच रुपये एवढा नीचांकी बाजारभाव मिळत आहे. तीन वर्षात प्रथमच केळीचे दर कोसळल्याने उत्पादक हतबल झाला आहे. एकरी उत्पादन खर्च दोन लाख रुपये आणि प्रत्यक्षात उत्पन्न ६० ते ७० हजार रुपये मिळत असल्याने याचा कसा मेळ घालायचा असा प्रश्न केळी उत्पादकांना पडला आहे.

मागील तीन चार वर्षांमध्ये केळीच्या बॉक्स पॅकिंग निर्यातक्षम मालाला २० ते २८ रुपये एवढा किलोला बाजारभाव मिळत होता तर खोडव्याच्या निर्यातक्षम मालाला पंधरा ते वीस रुपये दर मिळत होता व देशांतर्गत जाणारा स्थानिक माल दहा रुपयाच्या आत विकला नव्हता मात्र या आठवड्यात दरात प्रचंड घसरण झाली.

कंदर जिल्हा सोलापूर येथील केळीचे व्यापारी योगेश कदम म्हणाले, की मागणीपेक्षा मोठ्या प्रमाणात केळीची आवक वाढल्याने दरामध्ये मोठी घसरण झाले आहे. दोन वर्षांपूर्वी केळीची रोपे तयार करणाऱ्या ठराविक कंपनी होत्या मात्र त्यामध्ये आता मोठी वाढ झाल्याने लागवडीचे क्षेत्र वाढले आहे.

सध्या केळीचा उत्पादन खर्च एकरी दीड ते पावणे दोन लाख रुपये एवढा झाला आहे. एकरी उत्पादन सरासरी वीस ते पंचवीस टन निघते. मागील महिन्यात एका प्लॉटला २७ रुपये दर मिळाला आता दुसरा प्लॉट काढणीस आला आहे आणि दर पडलेले आहेत. सरासरी वीस रुपये दर मिळणे अपेक्षित आहे.
- अक्षय जाधव, युवा केळी उत्पादक, जाधववाडी (ता. इंदापूर)

शासन केळी लागवडीला अनुदान देते. मात्र त्याच्या गुणवत्तेवर लक्ष देत नाही. फक्त लागवड वाढून चालणार नाही तर निर्यातक्षम माल तयार करण्यासाठी खत व पाणी व्यवस्थापन त्यानंतर फ्रुटकेअर याबाबत शेतकऱ्यांना ॲग्रोनॉमिक सपोर्ट शासनाकडून मिळाला तरच केळीची गुणवत्ता वाढेल व हा माल आखाती देशाबरोबरच युरोपसह चीन जपान कोरिया रशिया या देशात जाईल व येथील मालाला अधिकचा चांगला दर मिळेल.
- जयकुमार शिंदे, अध्यक्ष- बना हेल्थ फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड, वरकुटे बुद्रुक.


03018

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com