शॉर्टसर्किटमुळे ऊस गोतोंडी येथे खाक
निमगाव केतकी, ता. १० : शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत गोतोंडी (ता.इंदापूर) ॲड. दशरथ भिवा खराडे यांचा एक एकर ऊस जळून खाक झाला. यामध्ये त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
ॲड. खराडे म्हणाले, विद्युत तारांचे घर्षण झाल्यानंतर काल मंगळवारी दुपारी शेतात असलेल्या त्याच्या ठिणंघ्या उसामध्ये पडल्यानंतर ऊस ने पेट घेतला.आज भिजवण्याचा प्रयत्न केला परंतु ती आटोक्यात न आल्यामुळे तोडणीस आलेला ऊस जळून गेला.
आगीमध्ये पीव्हीसी पाइप व ठिबक जळल्याने पंचवीस हजाराचे नुकसान झाले आहे तर उसाचे दहा टन वजनात घट होणार असल्याने व त्याला दर कमी मिळणार असलेल्याने तीस हजारापेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
निमगाव केतकी येथील महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली व ज्या ठिकाणी विद्युत तारांची घर्षण झाले आहे तेथील झाडाच्या फांद्या तोडून काढल्या. दरम्यान, बारामती ॲग्रो कारखान्याने आजपासून ऊस तोडून नेण्यास सुरुवात केली आहे.

