निमगावाच्या विद्यार्थ्यांची जंगल सफारी
निमगाव केतकी, ता. ११ : निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील श्री केतकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील हरित सेनेअंतर्गत ३ ते ५ डिसेंबर दरम्यान नेचर कॅम्पचे आयोजन केले होते. या विद्यालयातील हरित सेनेमध्ये सहभागी झालेल्या निवडक ५० विद्यार्थ्यांनी इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी, भिगवण तसेच बारामती तालुक्यातील सुपे येथील जंगल सफारीचा आनंद घेत पशू- पक्षांचे निरीक्षण केले.
राज्यातील पहिल्या गवत कुरण सफारीचा आनंद घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना सामाजिक वनविभागाच्या वनपाल अर्चना कवितके व राजू पवार यांनी येथील विविध पक्षाच्या प्रजाती व चिंकारा बाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना वनभोजनाची व्यवस्था केली होती. तसेच, विद्यार्थ्यांना कुंभारगाव (ता. इंदापूर) या ठिकाणी उजनी जलाशयामध्ये बोटिंगसह भारतीय, परदेशी असणाऱ्या फ्लेमिंगो पक्षांची माहिती देण्यात आली.
बारामती तालुक्यातील सुपे येथील मयुरेश्वर अभयारण्यातील लांडगा, चिंकारा, ससे, साळी, हरिण, कोल्हा, विविध प्राण्याविषयी तसेच पक्षाविषयी माहिती तेथील वनकर्मचारी सकट यांनी दिली. या सफारीसाठी सामाजिक वनीकरण पुणे विभागाच्या अधिकारी आशा भोंग, सहाय्यक वनसंरक्षक दीपक पवार, इंदापूरचे वनपरिक्षेत्राधिकारी एन. एस. पाटील यांनी सहकार्य केले.
विद्यालयाचे प्राचार्य एम. बी. भोग, पर्यवेक्षक के. डी. भोग, उपप्राचार्य एम. बी पाटील, हरित सेनेचे विभाग प्रमुख डी. डी. आरडे, एस. व्ही. देवकर, उपशिक्षिका एस. जे. तावरे, व्हि. एस. वणवे, जे. ए. झगडे यांच्या सहभागाने व सहकार्याने नेचर कॅम्प यशस्वी पार पडला.
03097
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

