खेड-शिवापूर टोलनाका हटवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-शिवापूर टोलनाका हटवा
खेड-शिवापूर टोलनाका हटवा

खेड-शिवापूर टोलनाका हटवा

sakal_logo
By

खेड-शिवापूर, ता. १५ : पुणे-सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर येथील टोलनाका हटविण्यासाठी खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. टोलनाका हटाव, या मागणीसाठी येत्या १ मार्च रोजी समितीतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांना समितीने बुधवारी दिले.
खेड शिवापूर येथील टोलनाका भोर तालुक्याच्या हद्दीबाहेर हटविण्यात यावा, या मागणीसाठी खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने दोन वर्षांपूर्वी आंदोलन केले होते. मात्र, या आंदोलनातील समितीच्या मागण्यांवर अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. असे असताना स्थानिक नागरीकांनी टोलसाठी मासिक पास काढावा, असा निर्णय टोल प्रशासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर टोलनाका हटाव समिती आक्रमक झाली आहे. त्यानुसार खेड-शिवापूर टोलनाका भोर तालुक्याच्या हद्दीबाहेर हटवा, या समितीच्या मुख्य मागणीसाठी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
समितीने या निवेदनात ज्या मागण्या केल्या आहेत, त्या आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम म्हणाले. बाबत या निवेदनात विचारणा केली आहे.

राजकीय पक्षांना इशारा
खेड-शिवापूर टोलनाक्यावर स्थानिक टोल वसुलीचा ठेका ज्या राजकीय पक्षाच्या नेत्याकडे असेल, त्या राजकीय पक्षाला ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत मतदान करू नये, असे आवाहन यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी केले.

टोलनाका हटाव ही आमची मुख्य मागणी आहे. मागील आंदोलनावेळी या मागणीवर कोणताही ठोस निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा टोल हटाव, या आमच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
- माउली दारवटकर, निमंत्रक,
खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समिती